आलोक शॉ ठरला डान्स दिवानेचे पहिला विजेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 10:16 IST2018-09-18T10:12:34+5:302018-09-18T10:16:43+5:30

तीन महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर कोलकत्याचा आलोक शॉने डान्स दिवानेचे विजेतेपद पटकावले आहे. आलोकला 5 लाख आणि ट्रॉफी बक्षिस म्हणून देण्यात आले.

Alok Shaw was the first winner of the dance diwane | आलोक शॉ ठरला डान्स दिवानेचे पहिला विजेता

आलोक शॉ ठरला डान्स दिवानेचे पहिला विजेता

ठळक मुद्देआलोकने परीक्षकांच्या मनात एक विशेष जागा निर्माण केली होती.माधुरी दीक्षितने त्याला छोटा पॅकेट बडा धमाका असे नाव ठेवले होते.

तीन महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर कोलकत्याचा  आलोक शॉने  डान्स दिवानेचे विजेतेपद पटकावले आहे. आलोकला 5 लाख आणि ट्रॉफी बक्षिस म्हणून देण्यात आले. या ग्रँड फिनालेमध्ये वरूण धवन आणि अनुष्का शर्माने देखील हजेरी लावली होती.  आलोकने परीक्षकांच्या मनात एक विशेष जागा सुरुवातीपासूनच तयार केली होती.  छोटा पॅकेट बडा धमाका अशा माधुरी दीक्षितने दिलेल्या नावाने त्याला ओळखला जाऊ लागले आहे. काही जबरदस्त परफॉर्मन्स आणि अविस्मरणीय अॅक्ट द्वारे त्याने मंचावर  डान्स जिवंत केला होता. विजेता म्हणून त्याचे नाव घोषित झाल्यानंतर आलोक म्हणाला, “मी अगदी भारावून गेलो आहे. हा एक अस्मरणीय अनुभव आहे आणि आता मी जिंकलो आहे तर मी माझ्या या गोष्टीवर विश्वासच ठेवता येत नाही आहे.  मागील काही आठवडे खूपच कठीण होते, त्यात अनेक वेळा वर-खाली आले. डान्स दिवाने आता मला माझ्या कुटुंबियांसारखी आहे आणि त्यांनी माझे कौशल्य विकसित केले आहे तसेच मला व माझ्या कुटुंबियांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मला दिली. मला संपूर्ण सीझनमध्ये मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या परीक्षकांचे आणि प्रेक्षकांचे मी आभार मानू इच्छितो .”


परीक्षकांच्या आणि स्पर्धकांच्या दिमाखदार परफॉर्मन्सने ही ग्रँड फिनाल्याची रात्र रंगली. माधुरी दीक्षित तिच्या काही मधुर गाण्यांवर नृत्य केले. परीक्षक शशांक आणि तुषार ने सुध्दा होस्ट अर्जुन सोबत काही इलेक्ट्रफाइंग परफॉर्मन्स सादर केले. वरूण धवन आणि अनुष्का शर्मा यांनी खतर पतर या नव्या गाण्यावरील जोरदार प्रवेशाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. संपूर्ण डान्स दिवाने टीमने आलोकला एक घर बक्षीस देऊन आश्चर्याचा धक्का दिला.  माधुरी दीक्षित, शशांक खेतान आणि तुषार कालिया यांना परीक्षक म्हणून हा सीझन अतिशय अवघड गेला. होस्ट अर्जुन बिजलानी आणि स्पर्धकांच्यामधील गंमतीशीर भांडणे असो डान्स दिवानेचा पहिला सीझन म्हणजे मनोरंजनाचा एक खजिनाच होता.

Web Title: Alok Shaw was the first winner of the dance diwane