अल्लादीनने राजकुमारी यास्मिनला दिली प्रेमाची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 17:56 IST2018-12-18T17:56:09+5:302018-12-18T17:56:48+5:30

सोनी सबच्‍या 'अल्लादीन: नाम तो सुना होगा' मालिकेच्या कथानकात दररोज नवे वळण पाहायला मिळत असून ते प्रेक्षकांचे लक्ष खेचून घेत आहे.

Alladin has given love to Princess Yasmine | अल्लादीनने राजकुमारी यास्मिनला दिली प्रेमाची कबुली

अल्लादीनने राजकुमारी यास्मिनला दिली प्रेमाची कबुली

सोनी सबच्‍या 'अल्लादीन: नाम तो सुना होगा' मालिकेच्या कथानकात दररोज नवे वळण पाहायला मिळत असून ते प्रेक्षकांचे लक्ष खेचून घेत आहे. अत्यंत प्रसिद्धी मिळवत असलेल्या या मालिकेतील आगामी ट्रॅक्समधूनही प्रेक्षकांना काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा होणार आहे. अल्लादीन (सिद्धार्थ निगम) यास्मिनकडे (अवनीत कौर) आपल्या प्रेमाची कबुली देणार आहे.


त्याचबरोबर जफर (अमीर दळवी) त्या खणकऱ्यांना घाबरवण्यासाठी त्याच्या सर्वशक्तिनीशी प्रयत्न करतो. अलादीनला अशी शंका आहे की, शम्सबरोबर लढणे बरोबर नाही. दरम्यान, कथा वेगळी कलाटणी घेते जेव्हा  अलादीन द्रव्य सोन्यापर्यंत पोहोचतो! दरम्यान, जफरची राक्षसी योजना सत्यात उतरते आणि त्या खाणीत स्फोट होतो. अलादीनला यावेळी यास्मिन (काली चोरनी म्हणून) भेटते आणि जीन सर्वांना सुरक्षितस्थळी घेऊन जातो. या सगळ्या कोलाहलात आणि नुकसानात अंतिमत: ओमरला हे कळते की त्याची पत्नी अजून जिवंत आहे. दरम्यान, शेवटी अलादीन उर्फ काला चोर धैर्य जमवून ‘काली चोरनी’ समोर आपल्या प्रेमाची कबुली देतो.


अल्लादीनची भूमिका करणारा सिद्धार्थ निगम म्हणाला, या मालिकेत काही नाटकीय वळणे आहेत, ज्यामुळे पुढच्या कथानकात रोमँटिक प्रसंग येणार असल्याची कुणकुण प्रेक्षकांना लागली असेल, जसे की त्यांचा आवडता अल्लादीन यास्मिनला आपल्या प्रेमाची कबुली देतो. आमच्या मालिकेला प्रेक्षकांनी दिलेला उदंड प्रतिसाद पाहून मी अत्‍यंत उत्‍साहित झालो आहे. अत्यंत कौशल्यवान सहकाऱ्यांसोबत या मालिकेत काम करण्याचा अनुभव खूपच आनंददायी आहे.

 

Web Title: Alladin has given love to Princess Yasmine