आलिका शेखची परदेस में है मेरा दिलमध्ये होणार एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 16:32 IST2017-02-20T11:02:04+5:302017-02-20T16:32:04+5:30

आलिका शेखने मन की आवाज प्रतिज्ञा, ज्योती, एक माँ की अग्निपरीक्षा यांसारख्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. आता ती ...

Alika Shaikh is in Pardes My entry in my heart | आलिका शेखची परदेस में है मेरा दिलमध्ये होणार एंट्री

आलिका शेखची परदेस में है मेरा दिलमध्ये होणार एंट्री

िका शेखने मन की आवाज प्रतिज्ञा, ज्योती, एक माँ की अग्निपरीक्षा यांसारख्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. आता ती लवकरच प्रेक्षकांना परदेस में है मेरा दिल या मालिकेत पाहायला मिळणार आहे. 
परदेस में है मेरा दिल या मालिकेच्या कथानकानुसार सध्या नैना परदेशात असल्याचे दाखवण्यात येत आहे. नैना आणि राघवमध्ये भांडणे झाले असून आता ते वेगवेगळे झाले असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. पण आता नैना पुन्हा भारतात आल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नैना भारतात आल्यावर एका कुटुंबियांसोबत पेइंग गेस्ट म्हणून राहाणार आहे. दिलराज कौर असे तिच्या घरच्या मालकिणीचे नाव असणार आहे. दिलराजची भूमिका या मालिकेत आलिका शेख साकारत असून या भूमिकेविषयी सध्या ती खूप उत्सुक आहे. याविषयी ती सांगते, "मी माझ्या कारकिर्दीची सुरुवात स्टार प्लस या वाहिनीवरून केली होती. मन की आवाज प्रतिज्ञा ही माझी या वाहिनीवरील पहिली मालिका प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. आता  मी तब्बल चार वर्षांनंतर या वाहिनीसोबत पुन्हा काम करत आहे. या वाहिनीसोबत पुन्हा काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. परदेस में है मेरा दिल या मालिकेत मी दिलराज ही भूमिका साकारत असून ही खूप शिस्तप्रिय स्त्री असल्याचे दाखवण्यात आले आहे. नैनाला ती तिच्या शिस्तीचे पालन करायला लावणार आहे. त्यामुळे तिची भूमिका खूपच इंटरेस्टिंग आहे. 
परदेस में है मेरा दिल या मालिकेत लवकरच लीप घेतला जाणार असून या मालिकेची कथा काही महिने पुढे जाणार आहे.
या मालिकेत काही दिवसांपूर्वी विनित रैना आणि अदा खान यांचीदेखील एंट्री झाली होती.  

Web Title: Alika Shaikh is in Pardes My entry in my heart