बहिणीचं लग्न …म्हणत अक्षया देवधरने शेअर केला खास व्हिडीओ,एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 17:57 IST2022-01-06T17:55:59+5:302022-01-06T17:57:21+5:30
अक्षया देवधरचा (Akshaya Deodhar) प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. रसिकांची आवडती अभिनेत्री म्हणून अक्षयासुद्धा गणली जाते. आज ती घराघरात प्रसिद्ध आहे.'तुझ्यात जीव रंगला' मालिकेने तिला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली.

बहिणीचं लग्न …म्हणत अक्षया देवधरने शेअर केला खास व्हिडीओ,एकदा पाहाच
अभिनेत्री अक्षया देवृंधर (Akshaya Deodhar) सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. याशिवाय ती नेहमी सोशल मीडियावर फोटोही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना दिसते. मात्र नुकताच अक्षयानं इंस्टाग्रामवर एक खा व्हिडीओ शेअर केला आहे. शेअर केलेला व्हिडीओ तिच्या बहिणीच्या लग्नातला आहे. अंकिता देवधर असे तिच्या बहीणीचे नाव आहे. या लग्नसोहळ्यासाठी तिने खास तयारी केली होती.
लेहंगा आणि त्यावर साजेसा मेकअप, ज्वेलरी असा साजश्रृंगार केल्याचे पाहायला मिळत आहे. बहिणीच्या लग्नात अक्षया देवधरचं सौंदर्य, तिचा अंदाज भलताच भाव खाऊन गेला. तिच्या या लूकवर चाहते फुल ऑन फिदा होत आहेत. लाईक्स कमेंट्स देत पसंती देताना दिसत आहेत. लग्नसोहळ्यातली सगळी मजा मस्ती तिने व्हिडीओ फोटो शेअर केल्याचे पाहायला मिळतंय.दोघी बहिणींमध्ये प्रचंड जिव्हाळ्याचं नातं आहे.त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघी बहिणींचे बॉन्डींग दिसते.अक्षया नेहमीचआपली फॅशन, स्टाईल याबाबत शनाया बरीच सजग असते. कुठेही बाहेर जाताना आपली ड्रेसिंग स्टाईल, फॅशन याची शनाया विशेष खबरदारी घेते.
अक्षया देवधरचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. रसिकांची आवडती अभिनेत्री म्हणून अक्षयासुद्धा गणली जाते. आज ती घराघरात प्रसिद्ध आहे.'तुझ्यात जीव रंगला' मालिकेने तिला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. अल्पावधीतच तिने रसिकांची मनं जिंकली होती आहेत. मालिका बंद झाली तरी पाठकबाई म्हणजेच अक्षयाची लोकप्रियता आजही कायम आहे. या मालिकेनंतर आता अक्षय हे तर काहींच नाही या शोमध्ये सुत्रसंचालन करताना दिसत आहे.