​अक्षय म्हात्रेची ही इच्छा पिया अलबेलामुळे झाली पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 15:05 IST2017-10-05T09:35:36+5:302017-10-05T15:05:36+5:30

पिया अलबेला ही मालिका सुरू झाल्यापासूनच ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे. खूपच कमी वेळात या मालिकेतील नरेन आणि ...

Akshay Mhatre's wish was fulfilled due to Piya Albale | ​अक्षय म्हात्रेची ही इच्छा पिया अलबेलामुळे झाली पूर्ण

​अक्षय म्हात्रेची ही इच्छा पिया अलबेलामुळे झाली पूर्ण

या अलबेला ही मालिका सुरू झाल्यापासूनच ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे. खूपच कमी वेळात या मालिकेतील नरेन आणि पूजा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. या मालिकेतील नरेनच्या भूमिकेत अक्षय म्हात्रेला तर पूजाच्या भूमिकेत प्रेक्षकांना शीना दासला पाहायला मिळत आहे. या मालिकेत आता काही वर्षांचा लीप घेतला जाणार असून या मालिकेच्या कथानकाला चांगलेच वळण मिळणार आहे. एवढेच नव्हे तर या मालिकेच्या व्यक्तिरेखांच्या लूकमध्ये प्रेक्षकांना खूप बदल पाहायला मिळणार आहे. 
पिया अलबेला या मालिकेची कथा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेने आता वर्षाचा लीप घेतला असून या मालिकेतील नरेनच्या पात्रात खूप बदल झाला आहे. आता नरेश जास्त ग्लॅमरस आणि स्टायलिश रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अक्षय स्टायलिश झाला असल्यामुळे त्याच्या गळ्यावर एक टॅटूदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या टॅटूमुळे अक्षय सध्या चांगलाच खूश आहे. कारण पिया अलबेला या मालिकेमुळे अक्षय म्हात्रेची एक इच्छा पूर्ण झाली आहे. अक्षयला त्याच्या खऱ्या आयुष्यात टॅटू काढण्याची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. पण काही कारणाने अनेकवेळा प्रयत्न करूनही टॅटू काढणे त्याला शक्य झाले नाही. पण आता या मालिकेमुळे तिची ही इच्छा पूर्ण झाली आहे. या मालिकेमुळे अक्षयला खरा नाही पण खोटा तरी टॅटू काढायला मिळाला आहे. त्याचा हा टॅटू आणि त्याच्या या नव्या लूकविषयी बोलताना अक्षय सांगतो, माझी टॅटू काढण्याची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. पण नेहमीच काही ना काही तरी घडले आणि माझी ही इच्छा पूर्ण झाली नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण काही वेळा तर मी टॅटू स्टुडिओतही जाऊन आलो आहे. पण तिथून देखील टॅटू न काढताच मी परतलो. नरेनच्या पात्रासाठी मला खोटा का होईना टॅटू काढण्याची संधी मिळाली आहे. माझी टॅटू काढण्याची इच्छा या मालिकेमुळे पूर्ण झाली असल्याने मी सध्या खूप खूश आहे. 

Also Read : पिया अलबेला या मालिकेतील शीन दास आणि पारुल चौधरी खऱ्या आयुष्यात आहेत बेस्ट फ्रेंड्स

Web Title: Akshay Mhatre's wish was fulfilled due to Piya Albale