घाडगे & सून मालिकेमध्ये या कारणामुळे अक्षय पुन्हा येणार घाडगे सदनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 12:09 IST2018-09-15T12:08:34+5:302018-09-15T12:09:38+5:30

माईंना कर्करोग आहे हे सत्य अक्षयला कळल्यावर तो हनिमूनवरून थेट माईंना भेटायला घाडगे सदन मध्ये येणार आहे. तो अनेक दिवसांनी घरात परत अाल्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद होणार आहे.  

Akshay bach in ghadge sadan in ghadge and soon | घाडगे & सून मालिकेमध्ये या कारणामुळे अक्षय पुन्हा येणार घाडगे सदनमध्ये

घाडगे & सून मालिकेमध्ये या कारणामुळे अक्षय पुन्हा येणार घाडगे सदनमध्ये

कलर्स मराठीवरील घाडगे & सून मालिकेमध्ये गणरायाचे आगमन होणार आहे. सध्या मालिकेमध्ये अमृता माईंना झालेल्या आजारामुळे चिंतेत आहे, माईना बरं करणं हे एकमेव ध्येय आता अमृतासमोर आहे. घाडगे सदन मध्ये कोणालाच माईच्या आजाराबद्दल माहिती नव्हते. परंतु आता माई त्यांना कर्करोग असल्याचे सत्य सगळ्यांना सांगणार आहेत. तसेच त्या गेल्या काही दिवसांपासून त्यावर उपचार देखील घेत असल्याचे सगळ्यांना कळणार आहे. माईंना कर्करोग आहे हे घरातल्यांना कळल्यामुळे सगळ्यांनाच खूप दुःख होणार आहे. या गोष्टीचे वसुधाला देखील खूप वाईट वाटत आहे. अक्षयला हे सत्य कळल्यावर तो हनिमूनवरून थेट माईंना भेटायला घाडगे सदन मध्ये येणार आहे. 

घरात गणरायाचे आगमन झालेले आहे आणि त्यात माईंना झालेल्या आजाराचे कळल्यामुळे अण्णा अक्षयला घरामध्ये येऊ देणार आहेत. मालिकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अक्षय, अमृताच्या आयुष्यामध्ये बऱ्याच घटना घडल्या आहेत. गणपतीला अमृताचे हेच मागणे असणार आहे की, माईना बरं करं आणि सगळ्या संकटांचे निवारण कर...  

घरामध्ये बऱ्याच दिवसांनी अक्षय आल्यामुळे त्याला बघून माई खूपच हळव्या होणार आहेत. अक्षयच्या येण्याने संपूर्ण घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. खूप दिवसांनी सगळे एकत्र आले असल्याचा आनंद सगळ्यांच्याच चेहऱ्यावर पाहायला मिळणार आहे. अक्षय घरी जात असताना अमृता त्याला कियाराला बाप्पाच्या दर्शनासाठी घेऊन ये असं सांगणार आहे. त्यामुळे अक्षय प्रचंड खुश होणार आहे... पण कियारा घरात आल्याने काय घडेल? तिला घाडगे परिवार स्वीकारेल का? अण्णा आणि माई तिला आशीर्वाद देतील का? या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना घाडगे & सून या मालिकेच्या आगामी भागांमध्ये मिळणार आहेत.

घाडगे & सून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या असून ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत चिन्मय उद्गीरकर अक्षयची तर भाग्यश्री लिमये अमृताची भूमिका साकारत आहेत तर माईच्या भूमिकेत सुकन्या कुलकर्णी आहेत. 

 
 

Web Title: Akshay bach in ghadge sadan in ghadge and soon