अक्षय आनंद घेणार ‘साम दाम दंड भेद’मालिकेचा निरोप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 12:23 IST2017-09-21T06:53:09+5:302017-09-21T12:23:09+5:30
‘साम दाम दंड भेद’ या नव्या मालिकेने अल्पावधीतच आपल्या रंजक कथानकामुळे प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली असून आता या ...

अक्षय आनंद घेणार ‘साम दाम दंड भेद’मालिकेचा निरोप!
‘ ाम दाम दंड भेद’ या नव्या मालिकेने अल्पावधीतच आपल्या रंजक कथानकामुळे प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली असून आता या मालिकेला लवकरच एक नवे वळण मिळणार आहे. भानू उदय आणि सोनल वेंगुर्लेकर यांच्या मालिकेत प्रमुख भूमिका असून त्यांना अक्षय आनंद आणि इव्हा शिराली यांची साथ लाभली आहे. अक्षय आनंद हा मालिकेतील विजय नामधारी या व्यक्तिरेखेचा भाऊ प्रभात नामधारीच्या भूमिकेत झळकत आहे. या मालिकेच्या कथानकाला मिळणार्या नव्या कलाटणीनुसार प्रभात नामधारीच्या व्यक्तिरेखेचा आता शेवट होणार आहे. ही कौटुंबिक कथा असली, तरी कथा जशी पुढे सरकते, तशी त्यात राजकारण शिरते आणि प्रभातची हत्याही राजकीय कारणास्तव होते. अक्षय आनंद हा या मालिकेतील एक लोकप्रिय कलाकार असला, तरी पटकथेच्या मागणीनुसार त्याची भूमिका संपुष्टात येत आहे.अक्षय आनंद म्हणाला, “ही भूमिका साकारण्याचा अनुभव खूपच समाधानकारक आणि चांगला होता. भानू हा एक चांगला धाकटा भाऊ होता आणि आमच्या दोघांतील नातं इतकं छान जुळलं होतं की आम्ही वास्तव जीवनातही एकमेकांना सख्खेभावा प्रमाणे ट्रिट करू लागलो होतो. आज आता ही मालिका आणि या सहकलाकारांबरोबर माझा शेवटचा दिवस आहे,यामुळे मला वाईट वाटणे सहाजिक आहे. या मालिकेच्या टीमसह माझं एक वेगळेच नाते निर्माणे झाले आहे.ते शब्दांत सांगणं शक्य नाही. ‘साम दाम दंड भेद’च्या याकुटुंबाबरोबर मजेत घावलेले दिवस हा एक एक वेगळाच अनुभव होता.”प्रभात आणि विजय यांच्यातील वैचारिक मतभेदांमुळे या दोघांतील पडद्यावरील नात्यावर सर्वांचे लक्ष होते. अक्षयच्या व्यक्तिरेखेचा शेवट होत असल्यामुळे उदास झालेला भानू उदय म्हणाला, “या ‘साम दाम दंड भेद’ मालिकेत भूमिका करण्याची सर्वात उत्तम भेट म्हणजे अक्षयभाईबरोबर एकत्र भूमिका साकारण्याची मिळालेली संधी. त्याच्याबरोबर भूमिका साकारताना तो किती चांगला माणूस आहे, हे मला समजलं. त्याने खरोखरच मला त्याच्या धाकट्या भावाप्रमाणे मानले आहे. त्याच्या भावी वाटचालीला माझ्या माझ्या मनापासून शुभेच्छा!”