'शुभमंगल ऑनलाईन'मधील ऐश्वर्याची सख्खी बहिणदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 07:00 IST2021-07-28T07:00:00+5:302021-07-28T07:00:00+5:30

समीधाने याआधी देखील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा रंगताना दिसते.

Aishwarya's sister in 'Shubhamangal Online' is also a famous actress | 'शुभमंगल ऑनलाईन'मधील ऐश्वर्याची सख्खी बहिणदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

'शुभमंगल ऑनलाईन'मधील ऐश्वर्याची सख्खी बहिणदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील मालिका शुभमंगल ऑनलाईनला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते आहे. या मालिकेत सुयश टिळक, सायली संजीव हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेत समीधा गुरू हिने ऐश्वर्याची भूमिका साकारली आहे. या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. फार कमी लोकांना माहित आहे की समीधा गुरूची सख्खी बहिणदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

अभिनेत्री समीधा गुरू सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल देशपांडेची बहिण आहे. मृणाल देशपांडेने अनेक मालिकेत काम केले आहे. पुढचं पाऊल मालिकेतून ती घराघरात पोहचली.

सध्या ती बावरा दिल या हिंदी मालिकेत काम करताना दिसते आहे. छत्रीवाली मालिकेतही तिने काम केले आहे. याशिवाय आणखी काही मालिकेत ती झळकली आहे. 


समीधा गुरू हिने 'कापूस कोंड्याची गोष्ट', 'कायद्याचं बोला', 'लाल इश्क' यांसारखे उत्तोमोत्तम चित्रपट.. 'गेट वेल सून', 'तळ्यात-मळ्यात' ही दर्जेदार नाटकं तर 'अवघाचि सांसार', 'कमला', 'क्राईम पेट्रोल', 'जिवलगा' या आणि अशा अनेक मालिकेत काम केले आहे.

अभिजीत गुरू हा समीधाचा नवरा असून त्याने दूरचिवाहिन्यांवर गाजलेल्या विविध मराठी मालिकांचे संवाद आणि पटकथा लिहिल्या आहेत. तो एक चांगला अभिनेता असण्यासोबतच एक खूप चांगला लेखक आहे.

Web Title: Aishwarya's sister in 'Shubhamangal Online' is also a famous actress