'त्या' एअर होस्टेचची प्रेमकहाणी अधुरीच राहिली! अजिंक्य राऊतचं अहमदाबाद विमान दुर्घटनेवरील 'तुला ना कळे' गाणं प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 16:20 IST2025-11-15T16:18:16+5:302025-11-15T16:20:16+5:30
अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींना समर्पित ‘तुला ना कळे’ गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. या रोमँटिक आणि भावनिक गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळतं आहे.

'त्या' एअर होस्टेचची प्रेमकहाणी अधुरीच राहिली! अजिंक्य राऊतचं अहमदाबाद विमान दुर्घटनेवरील 'तुला ना कळे' गाणं प्रदर्शित
अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघात हा भारताच्या हवाई अपघाताच्या इतिहासातील सर्वात भीषण अपघात होता. या अपघातात अनेकांनी कुटुंबातील आपल्या जवळची माणसं गमावली. अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींना समर्पित ‘तुला ना कळे’ गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. या रोमँटिक आणि भावनिक गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळतं आहे. सुप्रसिद्ध अभिनेता अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री श्रेया जाधव यांनी या गाण्यात प्रमुख भुमिका साकारली आहे.
प्रसिद्ध गायक हर्षवर्धन वावरे आणि गायिका शुद्धी कदम यांनी सुमधुर आवाजात हे गाणं गायलं आहे. तर गाण्याची गीतरचना आणि संगीत दिग्दर्शन अभिनंदन गायकवाड यांनी केले आहे. या गाण्याचे संगीत नियोजन मिलिंद मोरे यांनी केले आहे. या गाण्याचे दिग्दर्शक सागर साकत हे आहेत. या गाण्याची निर्मिती वैशाली काळे, सागर सकट आणि नितीन घुगे यांनी केली आहे. तर या गाण्यात प्रज्ञा कदम, प्रथमेश कदम, वैशाली जाधव, आशुतोष कांबळे, किरण राऊत, केतन रणखांबे, प्राजक्ता मोहिते आणि विजय सोनगिरे हे कलाकार देखील आहेत. हे गाणं मुंबईत चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्याचा संगीत अनावरण सोहळा नुकताच मुंबईत पार पडला.
“तुला ना कळे” गाण्याची निर्माती वैशाली काळे गाण्याच्या संकल्पनेविषयी सांगते, "’तुला ना कळे’ या गाण्याचा प्रवास सुंदर आणि सुखद आहे. एक अधुरी प्रेमकथा आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेत एक एयर हॉस्टेसच अपघाती निधन झाल तिची कहाणी आपण यात मांडली आहे. एस एन वी स्टुडिओ या संगीत रेकॉर्ड लेबलचं हे पहिलच गाणं आहे. मी, सागर साकत आणि नितीन घुगे या निर्मात्यांनी एकत्र येऊन हे प्रोडक्शन हाऊस सुरू केल आहे. येणाऱ्या नवीन वर्षात आमचे अनेक प्रोजेक्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हा रसिक प्रेक्षकांचं प्रेम कायम असंच राहू द्या.”
सुप्रसिद्ध अभिनेता अजिंक्य राऊत गाण्याच्या चित्रीकरणा दरम्यानचा किस्सा सांगतो, “गिरगावच्या १०० वर्षाहून जुन्या असलेल्या चाळीत आम्ही या गाण्याचं शूट केल. दोन दिवसाच्या शूटमध्ये तीन मिनिटाच्या गाण्यातून आम्ही ही कथा सादर केली आहे. स्पर्श न करता डोळ्यांनी पाहत हळुवार प्रेम फुलत जात. अस एका चाळीतल सुंदर प्रेम तुम्हाला अनुभवायला मिळेल. तसेच प्रेम, आनंद, विरह हे तुम्हाला एकाच गाण्यात पाहायला मिळेल. हे गाणं आम्ही दिवाळीच्या दिवसात शूट केलं. त्यावेळी चाळीतल्या एका घरी लाडू बनवताना खूप मज्जा आली. मी चाळीत राहिलो नाहीये. पण मी शूटिंग दरम्यान चाळीत राहण्याचा अनुभव घेतला. या गाण्याच्या संपूर्ण टीमने खूप मेहनत केली आहे. तुम्ही हे गाणं नक्की पाहा आणि खूप खूप प्रेम द्या.”