अग्गंबाई सूनबाई...! सासू सुनेच्या डान्सचा व्हिडीओ होतोय व्हायरल, पहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 15:10 IST2021-05-01T15:10:34+5:302021-05-01T15:10:51+5:30

सोशल मीडियावर आसावरी आणि शुभ्राचा रील व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

Aggambai Sunbai ...! Mother-in-law's dance video goes viral, watch this video | अग्गंबाई सूनबाई...! सासू सुनेच्या डान्सचा व्हिडीओ होतोय व्हायरल, पहा हा व्हिडीओ

अग्गंबाई सूनबाई...! सासू सुनेच्या डान्सचा व्हिडीओ होतोय व्हायरल, पहा हा व्हिडीओ

अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर अग्गंबाई सूनबाई ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेलाही प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. पहिल्या पर्वापेक्षा थोडे वेगळे कथानक मालिकेत दाखवण्यात आले आहे.  या मालिकेतील आसावरी आणि शुभ्राला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. दरम्यान आता सोशल मीडियावर आसावरी आणि शुभ्राचा रील व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत त्या दोघी डान्स करताना दिसत आहेत.
अग्गंबाई सूनबाई मालिकेत शुभ्राची भूमिका साकारणारी अभिनेत्री उमा हृषिकेश हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत आसावरी आणि शुभ्रा डोन्ट रश या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. या सासू सूनेचा रील चाहत्यांना खूप भावतो आहे. या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 


अग्गंबाई सूनबाई मालिकेत नुकताच नवीन ट्विस्ट आला आहे.  आता शुभ्राला आणखी एक धक्का बसणार आहे.  शुभ्रा आणि सोहमच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी आसावरी त्यांना सरप्राईज देते. पण त्यात सुझेन शुभ्राला सरप्राइज देण्याचा प्लान करते. त्यानुसार ती शुभ्रा रुमवर आहे हे सोहमला सांगत नाही. त्यामुळे सोहम आणि सुझेनचं प्रेमप्रकरण लवकरच शुभ्रा समोर येणार आहे. त्यानंतर शुभ्रा हा धक्का पचवू शकेल का? असा प्रश्न रसिक प्रेक्षकांना पडला आहे.

या सगळ्यात आसावरी आणि अभिजित मात्र सुनेच्या बाजूने उभे राहणार आहेत हे नक्की. मनाने खचलेल्या शुभ्राच्या आयुष्यात आता लवकरच आणखी एक नवी व्यक्ती येणार आहे.


 

Web Title: Aggambai Sunbai ...! Mother-in-law's dance video goes viral, watch this video