शुभ्राच्या आयुष्यात येणार नवा व्यक्ती, या अभिनेत्याची होणार एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 19:58 IST2021-05-03T19:52:00+5:302021-05-03T19:58:00+5:30

लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी सोहम आणि सुझेन चं प्रेमप्रकरण शुभ्रा समोर आलं. प्रकरणाचा शुभ्रा ला मोठा धक्का बसल्याने ती आत्महत्या करण्याचा निर्णय घेते.

Aggabai sunbai Serial Chinmay Udgirkar Entry | शुभ्राच्या आयुष्यात येणार नवा व्यक्ती, या अभिनेत्याची होणार एंट्री

शुभ्राच्या आयुष्यात येणार नवा व्यक्ती, या अभिनेत्याची होणार एंट्री

लोकप्रिय मालिका ‘अग्गंबाई सासूबाई’नंतर आता ‘अग्गंबाई सूनबाई’ ही मालिका सुरु झाली.  या मालिकेती काही कलाकारांना रिप्लेस करत नवीन कलाकारांची निवड करण्यात आली आणि नवीन ढंगात मालिका रसिकांच्या भेटीला आली. मालिकेचा दुसरा भाग छोट्या पडद्यावरी ‘अग्गबाई सुनबाई’ मालिका सध्या चर्चेत आहे. मालिकेच्या कथानकातील ट्विस्ट आणि टर्न्समुळे मालिका रसिकांना भावतेय.

 

मालिका रंजक वळणावर आली आहे. एक मोठा ट्विस्ट रसिकांंना पाहायला मिळणार आहे. मालिका सुरु झाली तेव्हा थोडा रसिकांचा नाराजीचा सूर पाहायला मिळाला होता. मात्र हळूहळू या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरत आहेत.

मालिकेत सध्या शुभ्राच्या आयुष्यात एक वादळ येणार आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी सोहम आणि सुझेन चं प्रेमप्रकरण शुभ्रा समोर आलं. प्रकरणाचा शुभ्रा ला मोठा धक्का बसल्याने ती आत्महत्या करण्याचा निर्णय घेते. त्याचवेळेस तिच्यासमोर अनुराग गोखले नावाची व्यक्ती येते.त्यामुळे  आता रसिकांचीही उत्सुकता आणखीनच वाढली आहे. शुभ्राच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एंट्री होणार आहे. 

हा अभिनेता आहे चिन्मय उद्गीरकर.‘अनुराग गोखले’  नावाची भूमिका तो साकारताना दिसणार आहे. अनुरागची एंट्रीने मालिकेत नवं वळण येणार  हे मात्र नक्की.  मालिकेत इथूनच  नवनवीन ट्विस्ट घडणार आहेत.  शुभ्राच्या आयुष्यात अनुरागची भूमिका नेमकी काय असणार याविषयी येणा-या भागांमध्ये रसिकांना पाहायला मिळेल. तुर्तास रसिकांचा लाडका चिन्मय पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर रसिकांच्या भेटीला येणार म्हटल्यावर चाहत्यांचाही आनंद नक्कीच द्विगुणित होणार हे मात्र नक्की.

Web Title: Aggabai sunbai Serial Chinmay Udgirkar Entry