अगस्त्य नंदाने सिमर भाटियाची ओढणी सांभाळली, ते पाहून बिग बींनी नातवाची केली चेष्टा; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:55 IST2026-01-01T13:54:46+5:302026-01-01T13:55:31+5:30
अमिताभ बच्चन यांच्या 'केबीसी' शोमध्ये अगस्त्य नंदा आणि सिमर भाटियाने हजेरी लावली

अगस्त्य नंदाने सिमर भाटियाची ओढणी सांभाळली, ते पाहून बिग बींनी नातवाची केली चेष्टा; म्हणाले...
अमिताभ बच्चन अनेक वर्षांपासून 'कौन बनेगा करोडपती' शो होस्ट करत आहेत. या शोमध्ये येणाऱ्या स्पर्धकांबरोबर बिग बी मजा मस्ती करताना दिसतात. अनेकदा त्यांची चेष्टाही करतात. कधी कधी काही स्पर्धकही अमिताभ बच्चन यांची मजा घेतात. नुकताच त्यांचा नातू अगस्त्य नंदा शोमध्ये आला होता. अगस्त्यचा 'इक्कीस सिनेमा रिलीज झाला आहे. सिनेमात त्याच्यासोबत सिमर भाटिया मुख्य भूमिकेत आहे. सिमरही अगस्त्यसोबत केबीसीमध्ये आली होती. हॉट सीटवर बसताना अगस्त्यने सिमरच्या साडीचा पदर सांभाळला. हे पाहून बिग बींनी नातवाची चेष्टा केली. ते काय म्हणाले वाचा.
अभिनेत्री सिमर भाटिया केबीसीमध्ये येताच अमिताभ बच्चन विचारतात, 'तुला केबीसीमध्ये येऊन कसं वाटतंय? तू पहिल्यांदाच आली आहेस.' यावर सिमर म्हणते, 'मला खूपच छान वाटतंय. तुम्ही ज्याप्रकारे अगस्त्यशी बोलताय ते मी पाहिलं. त्याने मला सांगितलं की तुमच्यासमोर मी डेकोरम मेन्टेन केलं पाहिजे.' तेव्हा बिग बी लगेच म्हणतात, 'डेकोरम वगैरे काही नाही. तू फक्त कंफर्टेबल हो बास, बाकी स्ट्रेस घेऊ नको'. नंतर अगस्त्य सिमरला म्हणाला, 'मी कधी तुला असं बोललो?' यावर बिग बी म्हणतात, 'तू का घाबरवतोय?' सिमर म्हणते, 'सेटवर त्याने माझी खूप काळजी घेतली.' नंतर अगस्त्य सिमरची ओढणी तिच्या हातात देताना दिसतो. हे पाहून बिग बी मजेत म्हणतात, 'मला हे पाहून खूप छान वाटलं. आयुष्यात पहिल्यांदाच मी तुला असं करताना पाहतोय. याआधी कधी तू असं केलं नाहीस. नक्की काय कारण असू शकतं?' अमिताभ बच्चन यांनी अशी चेष्टा केल्यावर सगळेच हसतात.
अमिताभ बच्चन यांनी नंतर धर्मेंद्र यांचीही आठवण काढली. 'इक्कीस' सिनेमात धर्मेंद्र यांचीही मुख्य भूमिका आहे. "'इक्कीस' हा चित्रपट म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील या महान व्यक्तिमत्त्वाने आपल्या लाखो चाहत्यांसाठी मागे सोडलेली एक शेवटची मौल्यवान आठवण आहे.एका कलाकाराला त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कला जोपासतो आणि माझे मित्र धर्मेंद्र यांनीही हेच केलं.'धरमजी फक्त एक व्यक्ती नव्हते, ते एक भावना होते, आणि भावना ही अशी गोष्ट आहे जी माणसाच्या हृदयातून कधीही दूर होत नाही. त्या आठवणी, आशीर्वाद बनतात आणि त्या तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात."