रश्मी देसाईनंतर निया शर्माने सोडली 'नागिन 4', मालिका होणार बंद ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 17:44 IST2020-05-26T17:16:20+5:302020-05-26T17:44:36+5:30

'नागिन 4'मध्ये रश्मि देसाईला काढून टाकण्याची माहिती कानावर आली होती.

After rashami desai nia sharma is also out from naagin 4 gda | रश्मी देसाईनंतर निया शर्माने सोडली 'नागिन 4', मालिका होणार बंद ?

रश्मी देसाईनंतर निया शर्माने सोडली 'नागिन 4', मालिका होणार बंद ?

‘नागिन’ या छोट्या पडद्यावरच्या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले. काहीच दिवसांपासून या मालिकेचे चौथे सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आला. जस्मिन भसीन आणि निया शर्मा ‘नागिन 4’मध्ये मुख्य भूमिकेत आहेत.  हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार काही दिवसांपूर्वी नागिन 4मध्ये रश्मि देसाईला काढून टाकण्याची माहिती कानावर आली होती. रश्मी शोमध्ये शलाकाची भूमिका साकारत होती. शोच्या निर्मात्याने तिची भूमिका संपवण्याचे ठरवले आहे. ही माहिती मिळाल्यानंतर रश्मीच्या फॅन्सना धक्का बसला होता.  

रिपोर्टनुसार निया शर्मा पण शोमधून बाहेर पडते आहे. दोनही अभिनेत्री आता या शोचा भाग नसणार आहेत. रिपोर्टनुसार रश्मिचे मानधन खूप जास्त होते. शोला खूप हवा तसा प्रतिसाद मिळाला देखील नाही त्यामुळे मेकर्सनी शोबंद करण्याचा निर्णय घेतला. अजून याबाबत चॅनलकडून शोच्या स्टारला कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

निया शर्मा 2017 मध्ये ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत निया तिस-या स्थानावर होती. पण 2018 मध्ये मात्र तिने तिस-या स्थानावरून दुस-या स्थानावर उडी घेतली होती.लंडन येथील ’इस्टर्न आय’ या मॅगझिनने ही 50 ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’ची यादी जाहीर केली होती.

Web Title: After rashami desai nia sharma is also out from naagin 4 gda