'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील 'या' कलाकारानेही सोडली मालिका, हे आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 14:33 IST2019-02-04T14:04:26+5:302019-02-04T14:33:26+5:30

या दोघांच्या अभिनयावर रसिक फिदा होते.मात्र मुलीच्या जन्मानंतर तिला वेळ देता यावा म्हणून दया भूमिका साकारणारी दिशा वाकानीने ही मालिका सोडली.

After Disha Vakani Nidhi Bhanushali Exit From Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील 'या' कलाकारानेही सोडली मालिका, हे आहे कारण?

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील 'या' कलाकारानेही सोडली मालिका, हे आहे कारण?

छोट्या पडद्यावरील रसिकांची आवडती मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. गेल्या अनेक वर्षापासून ही मालिका आणि मालिकेतल्या व्यक्तीरेखा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. यातील प्रत्येक पात्र विशेष आहे, मात्र रसिकांची आवडती जोडी ठरली ती जेठालाल आणि दया. या दोघांच्या अभिनयावर रसिक फिदा होते.मात्र मुलीच्या जन्मानंतर तिला वेळ देता यावा म्हणून दया भूमिका साकारणारी दिशा वाकानीने ही मालिका सोडली.

आता  तिच्या पाठोपाठ आणखीन एक व्यक्तिरेखा या मालिकेतून गायब होणार आहे. होय, भिडे मास्टरची मुलगी सोनूची भूमिका साकारणा-या निधीने ही मालिका सोडली आहे. अभ्यासाला वेळ देता यावा कारणामुळे तिने ही मालिका सोडली असल्याचे कारण समोर येत आहे. निधी भानुशाली सध्या ग्रॅज्यूएशन पुर्ण करतेय. शूटिंग दरम्यान वेळ मिळेल तसा ती  अभ्यास करायची. अभ्यासाला पुरेसा वेळ देता येत नाही. त्यामुळे सध्या तिने अभिनयापासून ब्रेक घेतल्याचे ठरवले आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका टीआरपी रेटींगमध्येही टॉपवर होती. मात्र गेल्या वर्षभरापासून दयाचे मालिकेत रसिकांना दर्शन घडत नसल्यामुळे शोच्या रेटिंगवरही प्रभाव पडतोय. 

दिशा वाकानीने मालिका सोडण्याआधी टप्पु भूमिका साकारणारा भव्य गांधीने हा शो सोडला होता.2008 मध्ये त्याने हा शो जॉइन केला होता.  मालिकेतील त्याच्या भूमिकेला कुठे तरी दुर्लक्षित केले जात होते असेही त्याचे म्हणणे होते . तसेच त्या भूमिकेतच न अडकता नवीन काही तरी करण्याच्या शोधात भव्य होता. त्यानुसार त्याने एका गुजराती सिनेमातही काम केले होते. आता  मालिके  टप्पुची भूमिकेत राज उनादकट झळकत आहे. दयाच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी नवीन अभिनेत्रीचा शोद सुरू केला नसला तरीही आता नवीन दयाची एंट्री केली जाणार असल्याचे संकेतही मालिकेचे निर्माते असिद मोदीने दिले आहेत. तुर्तास निधीनेही आता ही मालिका सोडली म्हटल्यावर तिच्या जागी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.    

Web Title: After Disha Vakani Nidhi Bhanushali Exit From Taarak Mehta Ka Ooltah Chashmah