Bigg Boss Marathi 2: शिवानी सुर्वेला लागली लॉटरी, कशी ते वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 07:15 IST2019-08-27T07:15:00+5:302019-08-27T07:15:00+5:30
सध्या बिग बॉसच्या घरातली सर्वाधिक स्ट्राँग कंटेस्टंट असलेल्या शिवानी सुर्वेसाठी 2019 हे वर्ष करीयरचा टर्निंग पॉईंट ठरले आहे.

Bigg Boss Marathi 2: शिवानी सुर्वेला लागली लॉटरी, कशी ते वाचा!
सध्या बिग बॉसच्या घरातली सर्वाधिक स्ट्राँग कंटेस्टंट असलेल्या शिवानी सुर्वेसाठी 2019 हे वर्ष करीयरचा टर्निंग पॉईंट ठरले आहे.बिग बॉसच्या घरातल्या सह-स्पर्धकांची आणि आपल्या चाहत्यांचीही लाडकी ठरलेल्या शिवानीची बिग बॉसनंतर फिल्म इंडस्ट्रीत घोडदौड चालुच राहताना दिसणार आहे.
शिवानी सुर्वेने गेल्या दहा वर्षातल्या यशस्वी टिव्ही कारकिर्दीमध्ये बिग बॉस मराठी हा रिअॅलिटी शो केला. आपल्या पहिल्याच रिअॅलिटी शोमधून शिवानीने रसिकांची मनं जिंकली. आता टेलिव्हिजन रसिकांची मनं जिंकल्यावर शिवानी सुर्वे सिनेरसिकांवरही आपली मोहिनी घालायला येणार आहे.
शिवानी सुर्वेचे ऑक्टोबर महिन्यात दोन मोठे सिनेमे रिलीज होत आहेत. अंकुश चौधरीसोबतचा ट्रिपल सीट आणि हेमंत ढोमे लिखीत-दिग्दर्शित सातारचा सलमान हे दोन्ही सिनेमे ऑक्टोबर महिन्यातच सिनेसरसिकांच्या भेटीला येत आहेत. शिवानीच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच डबल गुड न्यूज आहे.
2016 ला शिवानीचा घंटा हा सिनेमा आला होता. त्यानंतर आता तीन वर्षांनी ती रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. रूपेरी दूनियेत परतताना एकाच महिन्यात तिच्या दोन फिल्म्स रिलीज होत आहेत. 11 ऑक्टोबरला सातारचा सलमान तर ट्रिपल सीट हा चित्रपट 24 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. त्यामुळे शिवानीच्या ह्या सोनेरी भेटीने तिच्या चाहत्यांची दिवाळी नक्कीच धमाकेदार होईल.