"आम्ही कूल दिसतोय का?" राघव चड्ढा यांच्यासोबत आदित्य ठाकरेंनी शेअर केला फोटो, मराठी अभिनेत्री कमेंट करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 14:32 IST2023-10-12T14:31:01+5:302023-10-12T14:32:48+5:30

आदित्य ठाकरेंनी शेअर केला परिणीती-राघव यांच्या लग्नातील Unseen फोटो, मराठी अभिनेत्रीच्या कमेंटने वेधलं लक्ष

aditya thackeray shared raghav chaddha parinneti chopra wedding photo marathi actress shilpa tulsakar commented | "आम्ही कूल दिसतोय का?" राघव चड्ढा यांच्यासोबत आदित्य ठाकरेंनी शेअर केला फोटो, मराठी अभिनेत्री कमेंट करत म्हणाली...

"आम्ही कूल दिसतोय का?" राघव चड्ढा यांच्यासोबत आदित्य ठाकरेंनी शेअर केला फोटो, मराठी अभिनेत्री कमेंट करत म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप खासदार राघव चड्ढा काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकले. उदयपूरमधील लीला पॅलेसमध्ये परिणीती आणि राघव यांचा शाही सोहळा पार पडला. त्यांच्या विवाहसोहळ्याला राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरेदेखील परिणीती आणि राघव यांच्या लग्नाला उपस्थित होते. 

आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी परिणीती आणि राघव यांच्या लग्नातील फोटो शेअर केला होता. त्यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला होता. आता आदित्य यांनी पुन्हा राघव चड्ढा यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आदित्य आणि राघव दोघेही सूट बूट घालून डॅशिंग लूकमध्ये दिसत आहेत. या फोटोला आदित्य ठाकरेंनी "नवरदेवाबरोबरचा फोटो...आम्ही कूल दिसतोय का?" असं कॅप्शन दिलं आहे. 

परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या लग्नातील या unseen फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. पण, एका मराठी अभिनेत्रीने आदित्य यांच्या फोटोवर केलेली कमेंट चर्चेत आहे. मराठी अभिनेत्री शिल्पा तुळसकरने आदित्य आणि राघव यांच्या फोटोवर "Dapper" अशी कमेंट केली आहे. आदित्य ठाकरेंना टॅग करत शिल्पाने हार्ट इमोजीही पोस्ट केले आहेत.तिच्या या कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

दरम्यान, परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या लग्नासाठी आदित्य ठाकरे खास मुंबईहून उदयपूरला गेले होते. लग्नातील त्यांच्या लूकने लक्ष वेधून घेतलं होतं. लग्नातील काही फोटोही त्यांनी शेअर केले होते. 

Web Title: aditya thackeray shared raghav chaddha parinneti chopra wedding photo marathi actress shilpa tulsakar commented