आदित्य नारायणने का सोडलं 15 वर्षांचं होस्टिंग करिअर? काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 02:08 PM2022-03-10T14:08:22+5:302022-03-10T14:08:51+5:30

आदित्य नारायण (Aditya Narayan) सध्या भलताच चर्चेत आहेत. कारणं अनेक आहेत. सर्वात मोठ्ठ कारण म्हणजे, आदित्य नारायणने त्याचं चांगलं सुरू असलेलं होस्टिंग करिअर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

aditya narayan talk about quits hosting tv reality show know why | आदित्य नारायणने का सोडलं 15 वर्षांचं होस्टिंग करिअर? काय आहे कारण?

आदित्य नारायणने का सोडलं 15 वर्षांचं होस्टिंग करिअर? काय आहे कारण?

googlenewsNext

आदित्य नारायण (Aditya Narayan) सध्या भलताच चर्चेत आहेत. कारणं अनेक आहेत. सर्वात मोठ्ठ कारण म्हणजे, आदित्य नारायणने त्याचं चांगलं सुरू असलेलं होस्टिंग करिअर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 90 च्या दशकात आदित्य नारायण बालकलाकार म्हणून पहिल्यांदा स्क्रिनवर झळकला. मोठा झाल्यावर त्याने हिरो म्हणून डेब्यू केला. पण चित्रपटात त्याची जादू चालली नाही. चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आदित्यने छोट्या पडद्याकडे आपला मोर्चा वळवला. टीव्हीवरचे अनेक रिअ‍ॅलिटी शो त्याने होस्ट केलेत. छोट्या पडद्यावर मात्र त्याची जादू चालली. सारेगामापा, इंडियन आयडलसारखे मोठे शो त्याने होस्ट केलेत. सुमारे 15 वर्षांपूर्वी सारेगामापा मधून त्याने रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेत पाऊल ठेवलं. पण अलीकडे अचानक होस्टिंग सोडण्याचा निर्णय जाहिर करत त्याने सर्वांना धक्का दिला. आता मी होस्टिंग करणार नाही तर सिंगींग व फिटनेसवर लक्ष देणार आहे, असं त्याने सांगितलं.

होस्टिंग सोडण्याचा निर्णय मुळात घेतलाच का?
होस्टिंग सोडण्याच्या निर्णयामागे आदित्यची स्वत:ची काही कारणं आहेत. आता होस्टिंग आधीसारखी एक्साइट करत नाहीत, असं त्याचं म्हणणं आहे. याशिवाय पैशाची पण गोष्ट आहे. होस्टिंगसाठी चॅनल आत्ता देत आहेत, त्यापेक्षा जास्त पैसे देणार नाहीत. जास्त पैसा फक्त ए प्लस यादीतील कलाकार व निर्मात्यांनाच मिळतात, असं आदित्यचं म्हणणं आहे.
आदित्य नुकताच बाबा झाला. नुकताच त्याच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आदित्यने मुलीचं नाव त्विषा ठेवलं आहे. आता आदित्यला पत्नी आणि मुलीला वेळ द्यायचा आहे.

आदित्यने 2014 साली स्वत:चा बँड सुरु केला होता. त्याचे नाव आहे THE A TEAM.  आदित्यने आतापर्यंत 120 गाणी गायली आहेत. तोसुद्धा त्याच्या आईवडिलांप्रमाणे 16 वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गातो. ‘छोटा बच्चा जान के हमको’ या गाण्यातून आदित्य प्रसिद्धीझोतात आला.  वयाच्या 8 वर्षी आदित्य तीन सिनेमांत झळकला होता. रंगीला, परदेस आणि जब प्यार किसी से होता है या सिनेमात त्याने बालकलाकाराची भूमिका वठवली होती.

Web Title: aditya narayan talk about quits hosting tv reality show know why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.