आदित्य नारायणने लग्नाच्या तयारीपूर्वी सोशल मीडियावरुन घेतला ब्रेक, होणाऱ्या पत्नीसोबतचा पहिल्यांदाच शेअर केला फोटो

By गीतांजली | Updated: November 4, 2020 12:32 IST2020-11-04T12:32:15+5:302020-11-04T12:32:28+5:30

लग्नाच्या तयारीसाठी आदित्य सोशल मीडियावरुन ब्रेक घेण्यार असल्याचे सांगितले आहे.

Aditya narayan getting married to shweta agarwal takes a break from social media | आदित्य नारायणने लग्नाच्या तयारीपूर्वी सोशल मीडियावरुन घेतला ब्रेक, होणाऱ्या पत्नीसोबतचा पहिल्यांदाच शेअर केला फोटो

आदित्य नारायणने लग्नाच्या तयारीपूर्वी सोशल मीडियावरुन घेतला ब्रेक, होणाऱ्या पत्नीसोबतचा पहिल्यांदाच शेअर केला फोटो

गायक आदित्य नारायणने काही दिवसांपूर्वी  गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री श्वेता अग्रवालसोबत इन्स्टाग्राम पोस्टद्वारे लग्न करणार असल्याची घोषणा केली होती. दोघांचा एक सुंदर फोटो त्याने शेअर केला होता. आदित्या आता लग्नाची तयारीला लागणार आहे आणि त्याने याबद्दलची माहिती इन्स्टाग्रामवर दिली.  लग्नाच्या तयारीसाठी  आदित्य सोशल मीडियावरुन ब्रेक घेण्यार असल्याचे सांगितले आहे. 

आदित्य नारायणने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिले. ''आम्ही लग्न करणार आहोत! मी खूप भाग्यवान आहे की 11 वर्षांपूर्वी मला माझी सोबती श्वेता भेटली.    आम्ही डिसेंबरमध्ये लग्न करणार आहोत.'' तो म्हणाला की आपण पुढील माहिती देत ​​राहू आणि लग्नाच्या तयारीसाठी आपले सोशल मीडिया अकाउंट बंद करणार आहे. 

आदित्य नारायणने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "आम्ही दोघेही खूप खासगी माणसे आहोत आणि असा विश्वास आहे की खाजगी जीवन जगणे अधिक चांगले आहे. लग्नाच्या तयारीसाठी मी सोशल मीडियावरून ब्रेक घेत आहे. डिसेंबरमध्ये भेटूया.'' ही पोस्ट शेअर करताना आदित्यने एक फोटो देखील शेअर केला आहे. 

श्वेताने करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली आहे. श्वेता 2000 मध्ये टीव्ही सीरियल 'बाबुल की दुल्हनिया' मध्ये दिसली होती.यानंतर श्वेता 2001 मध्ये 'शगुन' आणि 2004 मध्ये 'देखा मगर प्यार से' मध्ये दिसली होती. श्वेताने साऊथ फिल्म इंडस्ट्रीबरोबर फिल्मी जगात पाऊल ठेवले. श्वेता शेवटची 2010मध्ये आलेला बॉलिवूड सिनेमा शापितमध्ये आदित्य नारायणसोबत शेवटची दिसली होती. हा एक हॉरर सिनेमा होता. 
 

Web Title: Aditya narayan getting married to shweta agarwal takes a break from social media