समोर आली लग्नाची तारीख, मंदिरात करणार आदित्य नारायण -श्वेता अग्रवालसोबत लग्न

By गीतांजली | Updated: October 17, 2020 12:49 IST2020-10-17T12:13:05+5:302020-10-17T12:49:03+5:30

प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण सध्या त्याच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे.

Aditya narayan and shweta agarwal wedding date know when couple going to tie knot and what will be plan | समोर आली लग्नाची तारीख, मंदिरात करणार आदित्य नारायण -श्वेता अग्रवालसोबत लग्न

समोर आली लग्नाची तारीख, मंदिरात करणार आदित्य नारायण -श्वेता अग्रवालसोबत लग्न

प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण सध्या त्याच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे.सध्या आदित्यच्या लग्नाची चर्चा जोरात आहे. ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत खुद्द आदित्यने ही माहिती दिली. त्याने सांगितले, ‘मी श्वेताला ‘शापित’ या चित्रपटाच्या सेटवर भेटलो होतो. आमच्या चांगले बॉन्डिंग झाले आणि हळूहळू ती तिच्या प्रेमात पडलो. सुरुवातीला तिला केवळ मैत्री हवी होती. कारण आम्ही दोघेही वयाने लहान होतो. दोघांनाही करिअरवर लक्ष केंद्रीत करायचे होते. प्रत्येक नात्याप्रमाणेच आमच्या नात्यातही बरेच चढऊतार आलेत. मात्र आमचे नाते अतूट राहिले. येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आम्ही लग्न करू शकतो. माझ्या आईवडिलांना श्वेता खूप आवडते.’

स्पॉटब्वॉयशी बोलताना आदित्य नारायणने सांगितले की तो 1 डिसेंबरला लग्न करणार आहे. कोरोना काळ्यात लग्न साधेपणाने करणार आहे. फक्त जवळच्या नातेवाईकांना लग्नाला आमंत्रित केल जाणार आहे. आदित्यने सांगितले का तो श्वेता अग्रवालसोबत देवळात लग्न करणार आहे. कोरोनाचा काळ संपल्यानंतर तो लग्नाचे मोठे रिसेप्शन देण्याबाबत विचार करतो आहे. 

श्वेताने करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली आहे. श्वेता 2000 मध्ये टीव्ही सीरियल 'बाबुल की दुल्हनिया' मध्ये दिसली होती.यानंतर श्वेता 2001 मध्ये 'शगुन' आणि 2004 मध्ये 'देखा मगर प्यार से' मध्ये दिसली होती. श्वेताने साऊथ फिल्म इंडस्ट्रीबरोबर फिल्मी जगात पाऊल ठेवले. श्वेता शेवटची 2010मध्ये आलेला बॉलिवूड सिनेमा शापितमध्ये आदित्य नारायणसोबत शेवटची दिसली होती. हा एक हॉरर सिनेमा होता. श्वेता व आदित्य गेल्या 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 
 

कंगाल झाल्याच्या बातम्यांवर आदित्यची प्रतिक्रिया; म्हणाला - माझे सासू-सासरे काय विचार करत असतील?

 

Web Title: Aditya narayan and shweta agarwal wedding date know when couple going to tie knot and what will be plan