आदिनाथची छोटया पडद्यावर एंट्री
By Admin | Updated: October 6, 2016 02:46 IST2016-10-06T02:46:53+5:302016-10-06T02:46:53+5:30
सतरंगी रे, झपाटलेला २, इश्कवाला लव्ह यांसारख्या चित्रपटात झळकलेला अभिनेता आदिनाथ कोठारे आता मालिकेत काम करणार आहे.

आदिनाथची छोटया पडद्यावर एंट्री
सतरंगी रे, झपाटलेला २, इश्कवाला लव्ह यांसारख्या चित्रपटात झळकलेला अभिनेता आदिनाथ कोठारे आता मालिकेत काम करणार आहे. ‘माझा छकुला’ या चित्रपटाद्वारे आदिनाथने बालकलाकार म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने चिमणी पाखरे, पछाडलेला यांसारख्या चित्रपटांचे सहायक दिग्दर्शन केले. ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेची त्याने निर्मितीही केलेली आहे आणि आता ‘हंड्रेट डेज’ या मालिकेद्वारे तो छोट्या पडद्यावर आगमन करत आहे. या मालिकेत तो इन्सपेक्टरच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तेजस्विनी पंडित त्याच्यासोबत या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तेजस्विनीने या आधी एकाच या जन्मी जणू, तुझे नि माझे घर श्रीमंतांचे, लज्जा यांसारख्या मालिकेत काम केले आहे. ही मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेची जागा घेणार असून, रात्रीस खेळ चाले या मालिकेप्रमाणेच ‘हंड्रेट डेज’ ही मालिकादेखील एक रहस्यमय मालिका असणार आहे. छोट्या पडद्यावर काम करण्यासाठी आदिनाथ खूपच उत्सुक असल्याचे कळतेय.