"आमचं फार जमायचं नाही", अंकिताच्या वक्तव्यावर उषा नाडकर्णी म्हणाल्या, "तिचं वागणं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 15:13 IST2025-06-06T15:08:43+5:302025-06-06T15:13:15+5:30
छोटा पडद्यावरील 'पवित्र रिश्ता' या हिंदी मालिकेने जवळपास पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

"आमचं फार जमायचं नाही", अंकिताच्या वक्तव्यावर उषा नाडकर्णी म्हणाल्या, "तिचं वागणं..."
Usha Nadkarni: छोटा पडद्यावरील 'पवित्र रिश्ता' या हिंदी मालिकेने जवळपास पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेच्या माध्यमातून अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत ही नावे घराघरात पोहोचली. या मालिकेला १६ वर्ष पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने अलिकडेच अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) तिच्या मुंबईतील घरी एका भव्य पार्टीचे आयोजन केलं होतं. या पार्टीत तिने पवित्र रिश्ता मालिकेतील ऑनस्क्रीन सासूबाई सविता देशमुखची भूमिका साकारणाऱ्या उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांना आमंत्रित केलं होतं. त्यादरम्यान या ऑनस्क्रीन सासू-सूनेच्या चांगल्या गप्पा रंगल्या.
दरम्यान, अंकिता लोखंडे आणि उषा नाडकर्णी यांचं पुनर्मिलन खूप आवडलं याचा व्हिडीओ अंकिताने तिच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. त्यामध्ये अंकिता लोखंडे उषा नाडकर्णींचे कौतुक करत म्हणाली, मला आठवतंय पवित्र रिश्ता मालिकेचा शेवटचा दिवस होता आणि मी आईला माझ्या रुममध्ये बोलावलं. खरं सांगायचं तर माझं आणि आईचं सेटवर फारसं जमायचं नाही. अंकिताच्या बोलणं ऐकून त्यावर बोलताना उषा नाडकर्णी म्हणाल्या, आम्हा दोघींमध्ये कधी वाद नाही झाले. पण, हीचं वागणं थोडं वेगळं असायचं. त्यामुळे मला राग यायचा
त्यानंतर पुढे अंकिता लोखंडे म्हणते, "त्या दिवशी मी आईंना माझ्या रुममध्ये बोलावलं आणि म्हटलं की, आई मला तुमच्यासोबत थोडं बोलायचं आहे. मी त्यांना सांगितलं होतं, तुम्हाला कधीही काही गरज लागली तर मी कायम तुमच्यासोबत असेन. तुम्हाला काही लागलं तर तुम्ही मला सांगा. तुम्हाला टेन्शन घेण्याची काही गरज नाही."त्यानंतर अंकिता उषा नाडकर्णींचं कौतुक करत म्हणते, "आई खूप मजबूत आहे. ती एकटी राहते. ती इतक्या लोकांसोबत एकटी राहते. मी इतक्या वर्षांपासून 'आई'ला पाहत आहे."असं म्हणत अंकिता लोखंडेने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.