'तिथून तू मला पाहत आहेस...', अभिनेत्री तेजश्री प्रधानची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 19:59 IST2023-12-31T19:55:21+5:302023-12-31T19:59:33+5:30

तेजश्रीच्या आयुष्यात तिच्या आईचं खूप महत्वाचं स्थान होतं.

actress Tejashree Pradhan's emotional post on social media | 'तिथून तू मला पाहत आहेस...', अभिनेत्री तेजश्री प्रधानची भावुक पोस्ट

'तिथून तू मला पाहत आहेस...', अभिनेत्री तेजश्री प्रधानची भावुक पोस्ट

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या कठीण काळातून जात आहे. तेजश्री प्रधानला मातृश्लोक झाला आहे.  १६ नोव्हेंबर रोजी तेजश्रीच्या आईचं दुःखद निधन झालं. तेजश्रीच्या आयुष्यात तिच्या आईचं खूप महत्वाचं स्थान होतं.  नुकतंच तेजश्रीने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली. तेजश्रीची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

तेजश्रीने इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने लिहले, 'तू तिथून मला पाहत आहेस, हे मला माहिती आहे.  तु माझ्यासाठी सर्व काही ठीक करशील, याच विश्वासाने मी माझं पुर्ण आयुष्य जगत राहणार आहे'.  तेजश्रीने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात आईला सोबत घेऊनच केली होती. त्यामुळे तिचा मोठा आधारस्तंभ आता हरपला आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. 

एकाने लिहले,' तुझ्या आईचे आशिर्वाद कायम तुझ्याबरोबर आहेत'. तर एका व्यक्तीने लिहले की, 'मला माहित आहे की या वर्षी तू "आई" ला गमावलं आहेस. परंतु तिला नेहमीच तुला आनंदात आणि यशस्वी पाहायला आवडेल. म्हणून आनंदी रहा आणि हा प्रवास पुढे चालू ठेवं, नवीन वर्षाच्या शुभेच्छा'.  तेजश्रीनं  चेहऱ्यावर सुंदर हास्य आणि सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.


 तेजश्री सध्या 'तुझ्या माझ्या  प्रेमाची गोष्ट' या मालिकेत काम करत आहे. यापूर्वी तिने होणार 'सून मी या घरची', 'अग्गंबाई सासूबाई' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर, 'ती सध्या काय करते', 'डॉ. प्रकाश बाबा आमटे', 'झेंडा', 'लग्न पहावे करुन' यांसारख्या सिनेमातही झळकली आहे.

Web Title: actress Tejashree Pradhan's emotional post on social media