आज तू सातासमुद्रापार गेलीस, आनंद ह्याचा आहे की तू.... लेकीच्या वाढदिवसाला सुकन्या मोनेंची भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 16:19 IST2023-02-28T16:12:28+5:302023-02-28T16:19:36+5:30

प्रसिद्ध अभिनेत्री संजय मोने आणि सुकन्या मोने यांची लेक ज्युलियाचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Actress Sukanya Mone write a special note for daughter Julia on her birthday | आज तू सातासमुद्रापार गेलीस, आनंद ह्याचा आहे की तू.... लेकीच्या वाढदिवसाला सुकन्या मोनेंची भावूक पोस्ट

आज तू सातासमुद्रापार गेलीस, आनंद ह्याचा आहे की तू.... लेकीच्या वाढदिवसाला सुकन्या मोनेंची भावूक पोस्ट

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या मोने (Sukanya Mone) बऱ्याच कालावधीनंतर झी मराठी वाहिनीकडे परतल्या आहेत. आभाळमाया, वादळवाट, जुळून येती रेशीमगाठी, चूक भूल द्यावी घ्यावी या मालिकांनंतर आता अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकेत दमदार भूमिकेत दिसत आहेत. सुकन्या सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

आज संजय आणि सुकन्या यांची लेक ज्युलियाचा वाढदिवस आहे. प्रसिद्ध अभिनेत्री संजय मोने आणि सुकन्या मोने यांची लेक ज्युलिया आज २१ वर्षांची झाली आहे. मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सुकन्या मोने लिहितात.. Happy birthday dear Julia आज तू सातासमुद्रापार तुझा २१ वा वाढदिवस साजरा करतेय आहेस....आनंद ह्याचा आहे की तू तिकडे जाऊनही तुझं विश्व,तुझे मित्र मैत्रिणी संग्रही केलेस आणि त्यांच्याबरोबर आजचा दिवस साजरा करते आहेस.खूप खूप शुभेच्छा आणि तुला खूप यश मिळो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना! सुकन्या यांच्या पोस्टवर अनेक सेलिब्रेटी कमेंट करत ज्युलियाला वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सुकन्या यांच्याकडे पाहिलं जातं. गेले अनेक वर्ष त्या कलाविश्वात सक्रीय असून अनेक मालिका, नाटकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. आई बाबांप्रमाणे ज्युलिया सुद्धा मनोरंजन विश्वात पदार्पण करणार का हे काहीच दिवसांमध्ये कळेल.
 

Web Title: Actress Sukanya Mone write a special note for daughter Julia on her birthday