अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदेच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण; जाणून घ्या तिच्या नवऱ्या विषयी खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 11:42 IST2021-12-08T11:28:21+5:302021-12-08T11:42:31+5:30

श्वेताने आपल्या पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या.

Actress shinde and sandeep bhansali completed 14 years of marriage | अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदेच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण; जाणून घ्या तिच्या नवऱ्या विषयी खास गोष्टी

अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदेच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण; जाणून घ्या तिच्या नवऱ्या विषयी खास गोष्टी

अभिनेत्री श्वेता शिंदेने अभियातच नाहीतर निर्मिती क्षेत्रातही आपली छाप पाडली आहे. ‘लागीर झालं जी’ मालिकेची निर्मीती श्वेता शिंदेनेच केली होती. मालिकेला मिळालेल्या भरघोस यशानंतर 'साता जल्माच्या गाठी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकांची निर्मितीही तिने केली होती. लवकरच श्वेता निर्मिती करत असलेली 'देवमाणूस 2' मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

अलीकडेच श्वेताच्या लग्नाला 14 वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त श्वेताने आपल्या पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या. फार कमी लोकांना माहिती आहे श्वेताचा पतीदेखील अभिनेता आहे. 2007मध्ये श्वेताने संदीप भन्साळीसोबत लग्न केलं. 'अपराधी कौन' या मालिकेदरम्यान दोघांची जवळीक वाढली होती. दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते.श्वेता आणि संदीपला एक मुलगीदेखील आहे.

संदीप भन्साळीने हिंदी मालिका विश्वात आपली ओळख निर्माण केली आहे. 'वो रेहनेवाली मेहलों की' ,'ईश्वर साक्षी', 'क्रिस और क्रीष्णा', 'मोहिनी', 'प्यार के दो नाम', 'एक राधा एक श्याम' या गाजलेल्या मालिकेत त्याने भूमिका साकारल्या आहेत.

 श्वेताने ‘कुमकुम’, ‘घराना’ यांसारख्या हिंदी आणि ‘चार दिवस सासूचे’, ‘अवघाचि संसार’ आणि ‘लक्ष्य’ यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केलं.श्वेताने मालिकांप्रमाणे चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 'बाप रे बाप डोक्याला ताप', 'देऊळबंद', 'इश्श्य', 'यळकोट यळकोट जय मल्हार' अशा सिनेमांमध्ये श्वेता शिंदेने भूमिका साकारल्या होत्या.

Web Title: Actress shinde and sandeep bhansali completed 14 years of marriage