'मुलगी झाली हो' मालिकेतील ही अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 12:53 IST2021-12-21T12:52:40+5:302021-12-21T12:53:09+5:30

मुलगी झाली हो (Mulagi Jhali Ho) या मालिकेतील या अभिनेत्रीच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

The actress from the series 'Mulgi Jhali Ho' is just married, the photos are going viral | 'मुलगी झाली हो' मालिकेतील ही अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, फोटो होतायेत व्हायरल

'मुलगी झाली हो' मालिकेतील ही अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, फोटो होतायेत व्हायरल

स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो (Mulagi Jhali Ho) या मालिकेत आर्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता अंबिकर (Shweta Ambikar) नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे. श्वेता अंबिकर आणि अभिनेता दिग्दर्शक अमेय गोरे रविवारी १९ डिसेंबर २०२१ रोजी विवाहबद्ध झाले. मेहंदी आणि हळदीच्या सोहळ्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.

 'मुलगी झाली हो' मालिकेत आर्याची भूमिका अभिनेत्री श्वेता अंबिकर हिने साकारली आहे. या मालिकेमुळे श्वेताला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. तिने काही दिवसांपूर्वी केळवणाचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर तिचे चाहते तिच्या लग्नबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. आता ती अमेय गोरेसोबत लग्नबेडीत अडकली आहे. 


ललित कला केंद्रमध्ये श्वेताची अमेय गोरे याच्यासोबत मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. अमेय स्वतः लेखक आणि दिग्दर्शक आहे यासोबतच त्याने काही नाटकांमधून अभिनय देखील केला आहे. याशिवाय तो स्वतःची एक नाट्य अकॅडमी चालवत आहे आणि यातून अनेक नवख्या कलाकारांना अभिनयाचे धडे त्याने दिले आहेत.

श्वेता अंबिकर ही मूळची पुण्याची आहे. अभिनयाची आवड असलेल्या श्वेताने ललितकला केंद्र मधून अभिनयाचे धडे गिरवले होते. तिने अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटात काम केले आहे. नाटकांतून काम करत असताना श्वेताने माझे मन तुझे झाले या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. दुर्वा, दिल दोस्ती दुनियादारी, स्वराज्यरक्षक संभाजी, बाजी या मालिकांमधून महत्वाच्या भूमिका साकारण्याची संधी तिला मिळत गेली. 

Web Title: The actress from the series 'Mulgi Jhali Ho' is just married, the photos are going viral