"लग्न झाल्यावर मी तिला...", सई ताम्हणकरने घरी आलेल्या सोनाली आणि तिच्या नवऱ्याला ठेवलं होतं उपाशी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 11:36 AM2023-07-26T11:36:34+5:302023-07-26T12:16:50+5:30

सई आणि सोनाली चांगल्या मैत्रिणी आहेत. पण याच सोनाली आणि तिच्या नवऱ्याला सईनं जेवायला बोलवून उपाशी ठेवलं होतं.

Actress Sai tamhankar revealed she invited sonalee kulkarni and her husband for lunch but made dinner | "लग्न झाल्यावर मी तिला...", सई ताम्हणकरने घरी आलेल्या सोनाली आणि तिच्या नवऱ्याला ठेवलं होतं उपाशी

"लग्न झाल्यावर मी तिला...", सई ताम्हणकरने घरी आलेल्या सोनाली आणि तिच्या नवऱ्याला ठेवलं होतं उपाशी

googlenewsNext

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर (Marathi actress Sai Tamhankar) आज बॉलीवूड चित्रपटांमधूनही तिचं स्थान निर्माण करताना दिसते आहे. मराठीमध्ये तर आजच्या आघाडीच्या नायिकांमध्ये सईचे नाव अग्रक्रमाने घेतले जातेच. पण महाराष्ट्राबाहेरही तिने तिचे अनेक चाहते निर्माण केले आहेत. सई लवकरच अवधूत गुप्तेच्या 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे. सईच्या इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री जवळच्या मैत्रिणी आहेत. यापैकीच एका अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. पण तुम्हाला माहिती आहे का सईने सोनाली आणि तिच्या नवऱ्याला उपाशी ठेवलं होतं. खुद्द सईनेच 'खुपते तिथे गुप्ते'मध्ये ही गोष्ट कबुल केली आहे. 


सध्या छोट्या पडद्यावर अवधुत गुप्तेचा 'खुपते तिथे गुप्ते' हा कार्यक्रम चांगला गाजतो आहे. आतापर्यंत अनेक राजकीय  मंडळींनी यात हजेरी लावत अनेक खुलासे केलं. ज्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात सई ताम्हणकर पाहुणी म्हणून येणार आहे. या कार्यक्रमातील तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. 

अवधुत गुप्ते सईला प्रश्न विचारतो तू लोकांना घरी जेवायला बोलवते आणि तासनतास त्यांना उपाशी ठेवतेस?,यावर उत्तर देताना सई म्हणाली, सोनाली कुलकर्णीला लग्न झाल्यावर मी तिला आणि तिच्या नवऱ्याला घरी जेवायला बोलवलं होतं. मी जेवण करेन असं सांगितलं. आम्ही गप्पांमध्ये इतके रमलो की दुपारचं जेवण बनवता बनवता त्याची रात्र झाली.' सईचं हे उत्तर ऐकून प्रेक्षकही हैराण झाले. 

Web Title: Actress Sai tamhankar revealed she invited sonalee kulkarni and her husband for lunch but made dinner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.