"मी विसरायला लागले आहे.."; अभिनेत्री रुबिना दिलैकच्या नवीन पोस्टमुळे चाहत्यांना चिंता, काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 10:14 IST2025-07-09T10:12:01+5:302025-07-09T10:14:28+5:30
रुबिना दिलैकच्या नवीन पोस्टची चर्चा आहे. जुळ्या मुलांची आई असलेली रुबिना या पोस्टमध्ये काय म्हणाली जाणून घ्या

"मी विसरायला लागले आहे.."; अभिनेत्री रुबिना दिलैकच्या नवीन पोस्टमुळे चाहत्यांना चिंता, काय म्हणाली?
टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री आणि बिग बॉस विजेती रुबिना दिलैक ही सोशल मीडियावर सक्रीय असते. रुबिना सध्या कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काम करत नसली तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. रुबिना दिलैकच्या नवीन पोस्टने मात्र तिच्या चाहत्यांच्या मनात चिंतेचं वातावरण तयार केलंय. रुबिना गोष्टी विसरायला लागलीय की काय? अशी शंका तिच्या फॅन्सच्या मनात निर्माण झाली आहे. काय म्हणाली रुबिना? जाणून घ्या.
रुबिनाच्या नवीन पोस्टची चर्चा
रुबिनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक स्टोरी शेअर केली. ही स्टोरी शेअर करुन रुबिनाने एक वाक्य पोस्ट केलंय. रुबिना लिहिते, "३० वर्ष ओलांडल्यावर कधी कधी मी माझं सध्याचं वय विसरते. मी कधी ३२ वर्षांची होते, कधी ३४ तर कधी ३६ वर्षांची होऊन जाते. मला एकच गोष्ट माहितीये की, मी ४० वर्षांची नाहीये." अशाप्रकारे रुबिनाने पोस्ट शेअर केल्याने चाहत्यांनी चिंता व्यक्त केलीय. रुबिना गोष्टी विसरायला लागलीय का? अशा कमेंट तिच्या फॅन्सने केल्या आहेत. अशाप्रकारे रुबिनाची नवीन पोस्ट चर्चेत आहे.
रुबिनाचं वर्कफ्रंट
टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैकन दोन वर्षापूर्वी तिच्या जुळ्या मुलींना जन्म दिला. सध्या ती मातृत्वाचा आनंद घेत आहे. दोन्ही मुलींची विशेष काळजी घेत आहे. २७ नोव्हेंबर २०२३ रोजी ती आई झाली. नुकतंच रुबिनाने पारस छाबडाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी तिने मुलींविषयी बोलताना मोठा खुलासा केला. रुबिना आणि अभिनव शुक्ला यांनी आपल्या मुलींना मुंबईत नाही तर हिमाचल प्रदेशमध्येच ठेवलं आहे. सध्या रुबिना कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये काम करत नसून ती कुटुंबाकडे लक्ष देतेय.