रेणुका शहाणेंनी सांगितलं टीव्ही इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्यामागचं कारण, म्हणाल्या- "रोज १८-१८ तास..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 16:30 IST2025-11-18T16:24:14+5:302025-11-18T16:30:02+5:30
"लोक कलाकारांना…", रेणुका शहाणेंनी सांगितला इंडस्ट्रीतील अनुभव, म्हणाल्या...

रेणुका शहाणेंनी सांगितलं टीव्ही इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्यामागचं कारण, म्हणाल्या- "रोज १८-१८ तास..."
Renuka Shahane: मराठीसह बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे रेणुका शहाणे. त्यांनी आजवर वेगवेगळे चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मात्र, त्यांच्या मुलाच्या जन्मानंतर रेणुका शहाणे काही काळ इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला. मुलं मोठी झाल्यानंतर त्यांनी पुन्हा टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पण,मालिकांमध्ये बदलेली कामाची अनिश्चित वेळ या सगळ्यामुळे त्या टीव्ही इंडस्ट्रीत रुळल्या नाहीत. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी मालिका क्षेत्रात आपला काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
रेणुका शहाणे या नेहमीच विविध विषयांवरील त्यांचे विचार, मतं स्पष्टपणे मांडत असतात. नुकतीच त्यांनी आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्याच्या निर्णयावर भाष्य केलं. त्या निर्णयाविषयी सांगताना त्या म्हणाल्या, मी त्या काळात जरा काम केलं. आणि ते मी विचारपूर्वक केलं. कारण, मला त्यावेळी माझ्या कुटुंबाला महत्त्व द्यायचं होतं आणि मला माझ्या मुलांकडे लक्ष द्यायचं होतं. माझं जास्त काम टेलिव्हिजनवर झालं आहे. त्यानंतर टीव्हीवर साप्ताहिक शोऐवजी दैनंदिन मालिका सुरू झाल्या."
त्यानंतर रेणुका शहाणे म्हणाल्या,"माझी मुलं जरा मोठी झाल्यावर २००७ मध्ये मी मालिकेत काम करण्याचा एक प्रयत्न केला होता. ‘जिते है जिसके लिए’ या नावाची एक मालिका होती. ती मालिका फार काळ चालली नाही,आणि एका अर्थी ते बरंच झालं. कारण, तो अनुभव फार भयानक होता."
लोक कलाकारांना वाटेल तसं बोलतात...
"आज मला जे कलाकार डेलीसोपमध्ये काम करत आहेत त्यांचं मला खूप कौतुक वाटतं. कारण, दैनंदिन मालिकांमध्ये कलाकार फार पॅशनने काम करत असतात. आणि लोक या कलाकारांना वाटेल तसं बोलतात आणि तरीही हे कलाकार सातत्याने काम करतात.त्यामध्ये कधीही कमतरता आणू देत नाही. ही गोष्ट खरंच किती मोठी आहे. मी तेव्हा १८-१८ तास काम करत होते. तेव्हा एक गोष्ट जाणवली की, नाही हे काम आपल्यासाठी पुरक नाही. त्यामुळे त्यानंतर आतापर्यंत मी मालिकांमध्ये काम केलं नाही.त्यानंतर आता हळूहळू वेब सीरिजचं युग आलं आणि मग मी मराठी चित्रपट, हिंदी सिनेमे करू लागले." असं मत त्यांनी व्यक्त केलं.