'गुम है किसी के प्यार मे'मध्ये दिसणार अभिनेत्री रेखा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 19:06 IST2021-08-09T19:05:52+5:302021-08-09T19:06:19+5:30

अभिनेत्री रेखा 'गुम है किसी के प्यार में' मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये पहायला मिळाल्या आहेत.

Actress Rekha to appear in 'Gum Hai Kisi Ke Pyaar Mein'? | 'गुम है किसी के प्यार मे'मध्ये दिसणार अभिनेत्री रेखा?

'गुम है किसी के प्यार मे'मध्ये दिसणार अभिनेत्री रेखा?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका गुम है किसी के प्यार मेंने एक आकर्षक कहाणी आणि ट्विस्टने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. विराट आणि सई यांची प्रेम कहाणी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे आणि पुढे येणाऱ्या ट्विस्टने प्रेक्षकांना आगामी महासप्ताहासाठी अधिक उत्साहित केले आहे.

अभिनेत्री रेखा 'गुम है किसी के प्यार में' सोबत आधीपासूनच जोडल्या गेल्या आहेत. नुकत्याच प्रसारित झालेल्या प्रोमोमधील त्यांची उपस्थिति, चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. आणि यासोबतच, या शोमध्ये एक रोमांचक डेवलपमेंट पाहायला मिळत आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, "रेखाजींची दुसऱ्या प्रोमोच्या चित्रीकरणानंतर या शो मध्ये एखादी विशेष एण्ट्री देखील असू शकेल. रेखाजींच्या प्रोमोजना मिळणाऱ्या प्रतिक्रिया अद्भुत आहेत आणि स्क्रिप्टमध्ये इतके शानदार ट्विस्ट आहेत की निर्माता या महासप्ताहाला मोठे यश मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत.” 

'गुम है किसी के प्यार में'च्या महासप्ताहाची चाहते आतुरतेने वाट पहात आहेत. सई आणि विराटबाबत चाहत्यांना अनेक प्रश्न पडत आहेत. काय सम्राटच्या पुन्हा एन्ट्रीने त्यांच्या प्रेम कहाणीला वेग येईल? काय विराट कधीच सईबाबतच्या आपल्या भावनांचा कधीच स्वीकार नाही करणार? हे मालिकेत पहायला मिळेल.

Web Title: Actress Rekha to appear in 'Gum Hai Kisi Ke Pyaar Mein'?

टॅग्स :Rekhaरेखा