Priya Marathe: हिरव्या रंगाच्या खाणाच्या साडीत खुललं प्रियाचं सौंदर्य, चाहते म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 16:45 IST2023-03-04T16:40:14+5:302023-03-04T16:45:04+5:30

प्रिया मराठे सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.

Actress Priya Marathe looks staying in green colour traditional saree | Priya Marathe: हिरव्या रंगाच्या खाणाच्या साडीत खुललं प्रियाचं सौंदर्य, चाहते म्हणाले....

Priya Marathe: हिरव्या रंगाच्या खाणाच्या साडीत खुललं प्रियाचं सौंदर्य, चाहते म्हणाले....

नाटक, सिनेमा आणि मालिका अशा विविध माध्यमांमधून प्रिया मराठे हे नाव घराघरात पोहोचले आहे. प्रियाने आपल्या अभिनयाच्या कौशल्याने रसिकांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केले आहे. प्रिया मराठे हिने छोट्या पडद्यावरील मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.‘या सुखांनो या’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर एंट्री मारली. यानंतर चार दिवस सासूचे या मालिकेत तिने काम केलं. सध्या ती तुझेच मी गीत आहे मालिकेत झळकतेय.

प्रिया मराठे सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. चाहते प्रियाच्या फोटोंना पसंती देत असतात. प्रियाने तिच्या फोटोशूटमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहेत.

हिरव्या रंगाच्या खणाच्या साडीतलं फोटो प्रियाने पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये प्रिया वेगवेगळ्या पोझ देताना दिसतेय. खणाच्या साडीत प्रिया खूपच सुंदर दिसतेय. हे फोटो शेअर करताना थ्रो बॅक असं कॅप्शन तिने या फोटोसोबत दिलं आहे. म्हणजेच प्रियानं तिच्या जुन्या फोटोंमधील काही फोटो शेअर केलेत. सुंदर ताई, ब्युटिफुल, किती सुंदर दिसतय, खूप छान अशा कमेंट्स तिच्या फोटोंवर केल्या आहेत.

तू तिथे मी या मालिकेत तिने साकारलेली निगेटिव्ह भूमिका विशेष गाजली.याशिवाय कसम से या मालिकेतून तिथे हिंदी मालिकांमध्ये एंट्री मारली.मात्र 'पवित्र रिश्ता' मालिकेतील भूमिकेमुळे ती प्रत्येकाची लाडकी बनली.'बडे अच्छे लगते' है,कॉमेडी सर्कसमध्येही प्रिया झळकली. तिने 'साथ निभाना साथिया' या मालिकेतही एंट्री मारली. या मालिकेतही तिची निगेटिव्ह भूमिका होती.

Web Title: Actress Priya Marathe looks staying in green colour traditional saree