अभिनेत्री प्रिया बेर्डे दिसणार छोट्या पडद्यावर, या मालिकेत येणार नवा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 14:29 IST2024-09-24T14:28:59+5:302024-09-24T14:29:15+5:30

अभिनेत्री प्रिया बेर्डे लवकरच छोट्या पडद्यावर काम करताना दिसणार आहेत.

Actress Priya Berde will appear on the small screen, a new twist will come in this series | अभिनेत्री प्रिया बेर्डे दिसणार छोट्या पडद्यावर, या मालिकेत येणार नवा ट्विस्ट

अभिनेत्री प्रिया बेर्डे दिसणार छोट्या पडद्यावर, या मालिकेत येणार नवा ट्विस्ट

'सन मराठी' वाहिनीवरील 'मुलगी पसंत आहे' या मालिकेने प्रेक्षकांना आपलंसे केले आहे. आता या मालिकेत प्रिया बेर्डे यांच्या धमाकेदार एन्ट्रीने मलिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आता प्रिया बेर्डे 'मुलगी पसंत आहे' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. शकुंतला डोंगरे असे या भूमिकेचे नाव असून  त्या यशोधराच्या नणंदेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. मालिकेत यशोधराला टक्कर देण्यासाठी शकुंतला सज्ज झाली आहे. 

आगामी भागात जिथे यशोधरा एका मीटिंगसाठी जायला निघते तिथे जायला तिला उशीर होतो. ती मीटिंग रूम मध्ये पोहोचते आणि समोर खुर्चीवर शकुंतलाला पाहून शॉक होते. शकुंतलाच्या एन्ट्रीमुळे यशोधराला धक्का बसतो. सरनाईकांच्या घरात शकुंतला येणार का? यशोधरासोबत शकुंतलाचे नाते संबंध कसे असणार? शकुंतलाच्या येण्यामुळे यशोधराच्या आयुष्यात नक्की कोणता बदल होणार? शकुंतलाच्या येण्यामुळे मालिकेत मोठं रंजक वळण येणार आहे. आता मालिकेत नक्की काय घडणार हे जाणून घेण्यासाठी 'मुलगी पसंत आहे' मालिका पाहावी लागेल.

Web Title: Actress Priya Berde will appear on the small screen, a new twist will come in this series