अभिनेत्री प्राजक्ता माळी कुणाला म्हणतेय. आओ ना..गले लगाओ ना.. ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 07:00 PM2021-02-05T19:00:00+5:302021-02-05T19:00:02+5:30

प्राजक्ता माळीला जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली.

Actress prajakta mali share her stunning photo on internet amp | अभिनेत्री प्राजक्ता माळी कुणाला म्हणतेय. आओ ना..गले लगाओ ना.. ?

अभिनेत्री प्राजक्ता माळी कुणाला म्हणतेय. आओ ना..गले लगाओ ना.. ?

googlenewsNext

प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. चित्रीकरणाच्यावेळेसचे फोटो, व्हॅकेशनचे फोटो प्राजक्ता  सोशल मीडियावर पोस्ट करत असते.  ब्लॅक रंगाचा स्टनिंग फोटो पोस्ट केला आहे. आओ ना..गले लगाओ ना...लगी बुझा दो ना ओ....असं कॅप्शन दिलं आहे.  प्राजक्ताचा हा फोटो पाहून तिचे चाहते फिदा झाले आहेत. 

प्राजक्ता माळीला जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. तिने यानंतर हम्पी, डोक्याला शॉट यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या. सध्या प्राजक्ता छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'चे सूत्रसंचालन करताना दिसते आहे.

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्राजक्ताने विविध भूमिका साकारल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी प्राजक्ताने लकडाउन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

Web Title: Actress prajakta mali share her stunning photo on internet amp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.