हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसतेय अभिनेत्री प्राजक्ता माळी, चाहते झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 06:30 PM2020-12-02T18:30:00+5:302020-12-02T18:30:04+5:30

सध्या प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसतेय.

Actress prajakta mali looks very glamorous in a green color dress | हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसतेय अभिनेत्री प्राजक्ता माळी, चाहते झाले फिदा

हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसतेय अभिनेत्री प्राजक्ता माळी, चाहते झाले फिदा

googlenewsNext

प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.


सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसतेय. या कार्यक्रमाच्या मचांवरही प्राजक्ता आपल्या ड्रेसिंग स्टाईलने साऱ्यांचे लक्ष वेधून घेते.  अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते .प्राजक्ताने नुकतेच हिरव्या रंगाच्या ड्रेसमधला फोटो शेअर केले आहे. या फोटोंवर नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. या फोटोत प्राजक्ता खूपच ग्लॅमरस लूकमध्ये दिसते आहे. 


मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत. प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. 

Web Title: Actress prajakta mali looks very glamorous in a green color dress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.