बिग बॉस फेम लोकप्रिय अभिनेत्रीची 'ठरलं तर मग' मालिकेत शानदार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 12:12 PM2024-04-08T12:12:20+5:302024-04-08T12:13:30+5:30

'ठरलं तर मग' मालिकेत बिग बॉस फेम लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री होणार असल्याने मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे

actress of Bigg Boss marathi ruchira jadhav entry in tharla tar mag serial | बिग बॉस फेम लोकप्रिय अभिनेत्रीची 'ठरलं तर मग' मालिकेत शानदार एन्ट्री

बिग बॉस फेम लोकप्रिय अभिनेत्रीची 'ठरलं तर मग' मालिकेत शानदार एन्ट्री

स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका. 'ठरलं तर मग' मालिका TRP मध्ये कायम अव्वल असते. या मालिकेतील सायली-अर्जुनची जोडी प्रेक्षकांच्या आवडीची. अल्पावधीतच या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलंय. या मालिकेत आता एका नवीन व्यक्तिरेखेची एन्ट्री होतेय. बिग बॉस मराठी फेम लोकप्रिय अभिनेत्रीची 'ठरलं तर मग' तर मालिकेत शानदार एन्ट्री होतेय. 

'ठरलं तर मग' मालिकेत बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री रुचिरा जाधवची एन्ट्री होतेय. रुचिराची भूमिका असलेला मालिकेचा नवीन प्रोमो रिलीज करण्यात आलाय. या प्रोमोत पाहायला मिळतं की अर्जुन कोणाची तरी वाट बघत असतो. सर्वांना उत्सुकता असते आता अर्जुनला भेटायला कोण येणार? अखेर घराच्या गेटमधून रुचिरा जाधवची एन्ट्री होते. अर्जुन तिला पाहताक्षणी मिठी मारतो. 

सर्वांना प्रश्न पडतो की, अर्जुनने मिठी मारलेली मुलगी नक्की आहे तरी कोण? अशाप्रकारे मालिकेत रुचिरा जाधवची एन्ट्री झालेली दिसते. रुचिरा या मालिकेच्या निमित्ताने अनेक वर्षांनी मालिका विश्वात कमबॅक करत आहे. रुचिराला आपण शेवटी 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत अभिनय करताना पाहिलं. रुचिरा बिग बॉस मराठी 4 मध्ये तिचा बॉयफ्रेंड रोहित शिंदेसोबत सहभागी झाली होती. रुचिराला पुन्हा एकदा मालिकेत पाहायला तिचे फॅन्स उत्सुक आहेत.  

Web Title: actress of Bigg Boss marathi ruchira jadhav entry in tharla tar mag serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.