प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, सर्वांना दाखवला 'लक्ष्मी'चा चेहरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 16:57 IST2025-10-31T16:48:10+5:302025-10-31T16:57:51+5:30
प्रसिद्ध अभिनेत्रीला मुलगी झाली असून तिने हॉस्पिटलमधूनच गोंडस मुलीचा चेहरा दाखवला चेहरा आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, सर्वांना दाखवला 'लक्ष्मी'चा चेहरा
काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिच्या लेकीचा चेहरा सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना दाखवला, हे आपल्याला माहितच आहे. आता प्रसिद्ध अभिनेत्री निधी झा (Nidhi Jha) दुसऱ्यांदा आई झाली आहे. अभिनेत्री निधी आणि तिचा पती अन् अभिनेता यश कुमार यांना मुलगी झाली आहे. छठ पूजेनंतर त्यांच्या घरी लगेचच ही आनंदाची बातमी आली आहे. काही तासांपूर्वी सोशल मीडियावर या जोडप्याने त्यांच्या घरी मुलगी झाल्याची घोषणा केली आहे.
सोशल मीडियावर दिली माहिती
यश कुमार आणि निधी झा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली. यश कुमारने लिहिले, "छठ पूजेनंतर लगेच आमच्या घरी लक्ष्मी आली आहे." या घोषणेनंतर तिचे चाहते आणि सिनेसृष्टीतील मित्रमंडळी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. छठ पूजेसारख्या पवित्र सणानंतर लगेच ही आनंदाची बातमी मिळाल्याने, यश आणि निधी यांच्या कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. या दोघांना 'शिवाय' नावाचा एक मुलगाही आहे.
निधी झा आणि यश कुमार यांनी एकमेकांसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१८ साली 'इंडिया वर्सेस पाकिस्तान' या सिनेमाच्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर या दोघांना एक मुलगा झाला. आता मुलगी झाल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंद निर्माण झाला आहे. इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी आणि त्यांच्या चाहत्यांनी दोघांंचं अभिनंदन केलंय.
