'तितली' मालिकेतून अभिनेत्री नेहा सोलंकी करणार पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 19:19 IST2023-04-15T19:18:30+5:302023-04-15T19:19:02+5:30

'तितली'मध्ये असाच एक नवा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून नेहा सोलंकी 'तितली'च्या शीर्षक भूमिकेत दिसणार आहे.

Actress Neha Solanki will make her debut from the serial 'Titli' | 'तितली' मालिकेतून अभिनेत्री नेहा सोलंकी करणार पदार्पण

'तितली' मालिकेतून अभिनेत्री नेहा सोलंकी करणार पदार्पण

स्टार प्लसची नवी मालिका 'तितली' सोबत, प्रेक्षक टेलिव्हिजनवर आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या मालिकेचे साक्षीदार होण्यास सज्ज झाले आहेत. स्टार प्लस नवीन प्रतिभांना संधी देण्यासाठी परिचित आहे. 'तितली'मध्ये असाच एक नवा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून नेहा सोलंकी 'तितली'च्या शीर्षक भूमिकेत दिसणार आहे.

नेहा सोलंकी ही एक प्रतिभावान अभिनेत्री असून 'तितली'मध्ये ती काम करताना दिसणार आहे. एका महत्त्वाकांक्षी तरुणीपासून भावनिकदृष्ट्या असुरक्षित अशा पात्राच्या विविध छटा प्रेक्षकांना पाहायला मिळतील. नेहा सोलंकी या आधी झी टीव्हीच्या 'सेठजी' आणि स्टार भारतच्या 'मायावी मलिंग' या मालिकांमध्ये दिसली आहे. स्टार प्लस आपल्या प्रेक्षकांसाठी 'तितली' नावाची एक अनोखी आणि यापूर्वी कधीही न पाहिलेली अशी प्रेमकथा घेऊन येत आहे. ही मालिका आपल्याला प्रेम या संकल्पनेविषयीच पुनर्विचार करायला लावेल. की काय खरंच प्रेम असं असतं?

तितली ही मालिका एक वळणदार प्रेमकथा असून तितली नावाची एक निखळ प्रेमळ आणि उत्साही मुलगी, तिच्या आयुष्यातील आदर्श जोडीदार शोधण्याच्या आणि त्याच्यासोबत एक स्वप्नवत जीवन जगण्याच्या कल्पनेत आहे. पण तिच्या वाट्याला अपेक्षित सुख येईल का? स्टार प्लस भारतीय टेलिव्हिजनमध्ये एक नवीन झेप घेण्याच्या तयारीत असून आपल्या प्रेक्षकांसाठी एक अशी अनोखी प्रेम-कथा आणण्यास सज्ज झाली आहे, जी छोट्या पडद्यावर यापूर्वी कधीही पाहिली गेली नसेल. 'तितली'ची निर्मिती स्टोरी स्क्वेअर प्रॉडक्शनने केली आहे.

Web Title: Actress Neha Solanki will make her debut from the serial 'Titli'