यापुढे 'तारक मेहता.. 'मध्ये कधीच दिसणार नाही बबिता? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच, म्हणाली-
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 10:38 IST2025-07-01T10:37:36+5:302025-07-01T10:38:35+5:30
बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री तारक मेहता.. मालिकेत यापुढे दिसणार नाही, अशी चर्चा होती. अखेर या चर्चांवर अभिनेत्रीने मौन सोडलंय

यापुढे 'तारक मेहता.. 'मध्ये कधीच दिसणार नाही बबिता? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच, म्हणाली-
टीव्हीवरील सर्वात गाजलेला आणि लोकप्रिय शो म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'. या मालिकेने गेली १५ वर्षांहून अधिक वर्ष ही मालिका प्रेक्षकांंचं मनोरंजन करत आहे. प्रत्येकाच्या घरात दररोज ही मालिका हमखास बघितली जात असणार, यात शंका नाही. खासकरुन जेवणाच्या वेळेस 'तारक मेहता...'चा एखादा भाग बघणं, ही अनेक घरची प्रथा असते, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अशातच या मालिकेतील बबिता अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ताने ही मालिका सोडली असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चांवर मुनमुनने एका वाक्यात खरं काय ते सांगितलं आहे.
बबिताने खरंच सोडली 'तारक मेहता..'?
गेल्या काही दिवसांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतून बबिता अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता एक्झिट घेणार असल्याची चर्चा होती. या चर्चांवर मुनमुनने केवळ एका वाक्यात रिअॅक्ट करुन प्रतिक्रिया दिली आहे. "प्रत्येक अफवा ही खरी नसते", अशा शब्दात मुनमुनने मालिकेच्या सेटवरील व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत बबिताचं घर दिसत असून ती 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेचं शूटिंग करताना दिसतेय. त्यामुळे बबिता यापुढे मालिकेत दिसणार नाही, या सर्व अफवा असल्याचं अभिनेत्रीने स्पष्ट केलंय.
गेल्या अनेक वर्षांपासून मुनमुन दत्ता ही 'तारक मेहता का उल्टा चष्मा' शोमध्ये काम करत आहे. मुनमुन या मालिकेच्या पहिल्या भागापासून आजतागायत बबिताच्या भूमिकेत आहे. मालिकेतील बबिता आणि जेठालालची खास केमिस्ट्री ही सर्वांना चांगलीच आवडते. मुनमुन रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. काही महिन्यांपूर्वी मुनमुन आणि मालिकेतील टप्पू अर्थात अभिनेता राज अनाडकटसोबत अफेअर असल्याची चर्चा होती. पण या चर्चांमध्येही काही तथ्य नसल्याचं समोर आलं.