मृणाल दुसानीसची लेक झाली इतकी मोठी; तुम्ही पाहिलंत का चिमुकल्या नुर्वीचे फोटो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 15:46 IST2023-05-22T15:39:23+5:302023-05-22T15:46:15+5:30

मृणालची लेक तिची कार्बन कॉपी असल्याचं कमेंट चाहते अनेकवेळा म्हणत असतात.

Actress mrunal dusanis latest photos with her daughter goes viral | मृणाल दुसानीसची लेक झाली इतकी मोठी; तुम्ही पाहिलंत का चिमुकल्या नुर्वीचे फोटो?

मृणाल दुसानीसची लेक झाली इतकी मोठी; तुम्ही पाहिलंत का चिमुकल्या नुर्वीचे फोटो?

'माझिया प्रियाला प्रीत कळेना' मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) छोट्या पडद्यावरुन गायब आहे. सध्या ती अमेरिकेत राहत असून घर संसारात रमली आहे. गेल्याच वर्षी २४ मार्च रोजी मृणालने गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे नाव नुर्वी (Nurvi) असे ठेवण्यात आले. नुर्वीचा एक गोंडस व्हिडिओ मृणालने शेअर केला आहे. 

मृणाल दुसानिस गेल्या तीन वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास आहे. पती नीरज मोरे आणि मुलगी नुर्वीसह आनंदात आहे. चिमुकल्या नुर्वीचे एक व्हिडिओ आणि फोटो मृणालने शेअर करत असते.. मृणालच्या या फोटोंना सोशल मीडियावर पसंती मिळत आहे.

मृणालच्या या नव्या फोटोंवर चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत. 'तू अजूनच छान दिसत आहेस', 'नेहमीसारखेच सुंदर फोटो', 'मुलगी खूपच गोड आहे' अशा भावना चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

२०२० पर्यंत मृणालने अभिनय क्षेत्रात काम केले. मृणाल 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेत शेवटची दिसली. यातील तिची आणि शशांक केतकरची जोडी प्रेक्षकांनाही आवडली. २०१६ मध्ये मृणालने नीरज मोरेशी लग्नगाठ बांधली. नीरज सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. कामानिमित्त तो आधीपासूनच अमेरिकेत असल्याकारणाने नंतर मृणाललाही तिकडेच स्थायिक व्हावे लागले.सुखाच्या सरींनी मालिकेवेळी ती भारतात आणि नीरज अमेरिकेतच होता. मालिका संपताच ती अमेरिकेत गेली. मृणाल आता पुन्हा अभिनय क्षेत्रात परतणार का याबद्दल तिने अजुन काहीच सांगितलेले नाही. 

Web Title: Actress mrunal dusanis latest photos with her daughter goes viral