'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून तब्बल ५ वर्षांनी या अभिनेत्रीने केले कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 07:00 IST2021-09-02T07:00:00+5:302021-09-02T07:00:00+5:30

झी मराठी वाहिनीवर नुकतीच 'माझी तुझी रेशीमगाठ' ही नविन मालिका दाखल झाली.

The actress made a comeback after 5 years from the series 'Majhi Tujhi Reshimagath' | 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून तब्बल ५ वर्षांनी या अभिनेत्रीने केले कमबॅक

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून तब्बल ५ वर्षांनी या अभिनेत्रीने केले कमबॅक

झी मराठी वाहिनीवर नुकतीच 'माझी तुझी रेशीमगाठ' ही नविन मालिका दाखल झाली. एका आठवड्यातच या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेली पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे या मालिकेत परीची भूमिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली पाहायला मिळत आहे. परीचा निरागसपणा आणि तिचा समजूतदारपणा प्रेक्षकांना खूपच भावला आहे. या मालिकेत नेहा आणि परीच्या घरा शेजारी एक जोडपे राहत असलेले दाखवले आहे. नेहा ऑफिसमध्ये गेल्यावर हे काका-काकू परीची काळजी घेताना दिसतात. काकूंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने जवळपास ५ वर्षांनी झी मराठी वाहिनीवर कमबॅक केले आहे.

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत काकूंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे मानसी मागिकर. याआधी तुम्ही त्यांना झी मराठी वाहिनीवर २०१४ ते २०१६ या कालावधीत प्रसारीत होणारी मालिका का रे दुरावामध्ये पाहिले असेल. याशिवाय त्या झी मराठीच्या २०१६ साली खुलता कळी खुलेना मालिकेतही पहायला मिळाल्या होत्या.


मानसी मगिकर या पूर्वाश्रमीच्या विनया तांबे. उत्तम गायिका आणि नाट्य अभिनेत्री म्हणून त्यांनी सुरुवातीला कलाक्षेत्रात नाव कमावले होते. त्यांची आई सुनंदा तांबे पतीच्या निधनानंतर तीन मुलींचे पालनपोषण व्हावे म्हणून स्वेटर तयार करून ते विकण्याचा व्यवसाय करत असत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही वर्षांपूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांची मुलगी विनया तांबे विजय मागिकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या लग्नानंतर त्या मानसी मागिकर या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. विजय मागिकर हे गरवारे कंपनीत आबासाहेब गरवारे यांचे पीए म्हणून काम करत होते. त्यानंतर रेव्हेन्यू कॉलनीत स्वतःच्या घरातच लिक्विड साबणाचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. ३० ते ३५ वर्षांचा त्यांचा हा व्यवसाय सुरू असताना त्यांनी राजदत्त यांच्या मार्गदर्शनाखाली असिस्टंट डायरेक्टर म्हणून ‘शापित’, ‘पुढचं पाऊल’ हे चित्रपट आणि ‘गोट्या’ मालिका केली.

गोट्या या लोकप्रिय मालिकेत मानसी मागिकर यांनी माईंची भूमिका अतिशय सुरेख साकारली होती. सहदिग्दर्शक आणि अभिनेत्री म्हणून गोट्या मालिकेतून तसेच पुढचं पाऊल या चित्रपटातून दोघांनी एकत्रित काम केले होते. ‘एकाच या जन्मे जणू…’ हे लोकप्रिय गाणं पुढचं पाऊल या चित्रपटातील आहे. हे गाणे मानसी मागिकर यांच्यावर चित्रीत झाले आहे. 
लग्न पहावे करून, हुप्पा हुय्या, हापूस, घरकुल वेबसिरीज यातील त्यांच्या कामाचे कौतुक झाले आहे. मानसी आणि विजय मागिकर यांना ‘वरुण’ हा एकुलता एक मुलगा आहे.

Web Title: The actress made a comeback after 5 years from the series 'Majhi Tujhi Reshimagath'