लग्न न करताच लोकप्रिय अभिनेत्रीला व्हायचंय आई, म्हणाली- "मला मुलीला दत्तक घ्यायचंय आणि..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 16:09 IST2025-08-21T16:07:10+5:302025-08-21T16:09:22+5:30
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न न करताच एका मुलीची आई व्हायचंय, अभिनेत्रीने याविषयी खुलासा केलाय

लग्न न करताच लोकप्रिय अभिनेत्रीला व्हायचंय आई, म्हणाली- "मला मुलीला दत्तक घ्यायचंय आणि..."
प्रसिद्ध अभिनेत्री जस्मिन भसीन सध्या चांगलीच चर्चा आहे. जस्मिनला लग्न न करताच एका मुलीची आई व्हायची आहे. अभिनेत्री एक मुलगी दत्तक घेण्याच्या विचारात आहे. तिच्या या निर्णयामागे एक खास कारण आहे. जस्मिनने 'आस्क मी एनीथिंग' या सोशल मीडिया सेशनदरम्यान एका मुलीला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली. एका युजरने तिला विचारले की, तिला भविष्यात आई होण्याची इच्छा आहे का? या प्रश्नावर तिने होकारार्थी उत्तर दिलं. जस्मिन काय म्हणाली, जाणून घ्या.
जस्मिनला लग्न न करताच व्हायचंय आई
जस्मिनने नेटकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देत सांगितलं की, लग्न करुन आई होण्याऐवजी ती एका मुलीला दत्तक घेण्यास प्राधान्य देईल. जस्मिनच्या या निर्णयामागे एक भावनिक कारण आहे. तिने सांगितलं की, "जेव्हा मी पहिल्यांदा मुंबईत आले आणि घर सोडले, तेव्हा मला समजले की जीवन किती कठीण आहे. मला त्यावेळी खूप संघर्ष करावा लागला. त्यावेळी मी देवाला एक वचन दिलं होतं की, जर मला कधीही यशस्वी आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर आयुष्य मिळाले, तर मी एका निरागस मुलीला दत्तक घेईन आणि तिला असं सर्व काही देईन, जे माझ्याकडे नव्हतं."
जस्मिनने हे देखील स्पष्ट केले की, ती आई होण्यासाठी लग्न करेल असे नाही. तिच्या मते, आईपणाची भावना ही नैसर्गिक आहे आणि ती कोणत्याही सामाजिक बंधनावर अवलंबून नसते. यापूर्वी ती 'बिग बॉस'च्या घरात असतानाही तिने हीच इच्छा व्यक्त केली होती. जस्मिनच्या या निर्णयाचं आणि तिच्या विचाराचं अनेकांनी कौतुक केलं आहे. जस्मिनने मुलगी दत्तक घेण्याचा विचार उघडपणे बोलून दाखवला. जस्मिनच्या या निर्णयाचं अनेकांनी समर्थन केलं आहे. जस्मिनने घेतलेल्या या निर्णयामुळे तिने तिच्या चाहत्यांना सकारात्मक संदेश दिला आहे.