'आई कुठे काय करते'मधील या अभिनेत्रीला मिळाला मोठा ब्रेक; झळकणार या साउथच्या स्टारसोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 12:55 IST2022-01-10T12:54:23+5:302022-01-10T12:55:45+5:30

आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte) मधील या अभिनेत्रीने साउथच्या अभिनेत्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून ही माहिती दिली आहे.

The actress got a big break in 'Aai Kuthe Kay Karte'; she will be seen with this Southern star | 'आई कुठे काय करते'मधील या अभिनेत्रीला मिळाला मोठा ब्रेक; झळकणार या साउथच्या स्टारसोबत

'आई कुठे काय करते'मधील या अभिनेत्रीला मिळाला मोठा ब्रेक; झळकणार या साउथच्या स्टारसोबत

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) कथानक आणि त्यातील पात्रांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. या मालिकेतील कांचन, आप्पा, संजना, यश, ईशा, गौरी, आशुतोष, विशाखा, अनघा यासारख्या भूमिका प्रेक्षकांना आपल्या करत आहेत. या मालिकेत विशाखाची भूमिका अभिनेत्री पूनम चांदोरकर (Punam Chandorkar) हिने साकारली आहे. पूनमला मोठा ब्रेक मिळाला असून ती दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यासोबत काम करताना दिसणार आहे. 

अभिनेत्री पुनम चांदूरकर आता एका दिग्गज अभिनेत्यासोबत काम करताना दिसणार आहे. ती लवकरच दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत काम करताना दिसणार आहे. हा कुठला चित्रपट आहे याबाबतची माहिती मिळाली नाही. मात्र, हा एक जबरदस्त चित्रपट असल्याची माहिती मिळत आहे.


आई कुठे काय करते मालिकेत सध्या अभिषेक आणि अनघाचे लग्न पार पडले आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. आशुतोषची अरुंधतीसोबत वाढती मैत्री अनिरूद्धला आवडत नाही. लग्नातून अनिरूद्ध आशुतोषला तू या घरातला नाही आहेस आणि तू इथून जा असे सांगतो. मात्र तितक्यात अरूंधती त्यांना थांबवते आणि सांगते की तुम्ही माझे बिझनेस पार्टनर आहात आणि त्यासोबत चांगले मित्रदेखील आहात. अखेर अरुंधतीने आशुतोषची मैत्री स्वीकारली आहे.

Web Title: The actress got a big break in 'Aai Kuthe Kay Karte'; she will be seen with this Southern star