'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतून 'ही' अभिनेत्री पडली बाहेर, समोर आले धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 15:44 IST2021-12-04T15:44:06+5:302021-12-04T15:44:31+5:30

सुंदरा मनामध्ये भरलीमधील या अभिनेत्रीने मालिका सोडल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.

This actress fell out of the series 'Sundara Manamadhye Bharli', this is reason | 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतून 'ही' अभिनेत्री पडली बाहेर, समोर आले धक्कादायक कारण

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतून 'ही' अभिनेत्री पडली बाहेर, समोर आले धक्कादायक कारण

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका सुंदरा मनामध्ये भरलीने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील अभ्या आणि लतिकाची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावते. या मालिकेमध्ये लतिकाची भूमिका अभिनेत्री अक्षया नाईक हिने साकारली आहे. तर अभ्याची भूमिका अभिनेता समीर परांजपे याने साकारली आहे. या मालिकेमध्ये उमेश दामले यांनी देखील बापूंची भूमिका निभावली आहे. तर सज्जनराव, दौलत या भूमिकाही प्रेक्षकांना खूप भावतात.  या मालिकेतील एका अभिनेत्रीने नुकतीच मालिका सोडल्याचे समजते आहे.

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत नंदिनीची भूमिका अभिनेत्री आदिती द्रविडने साकारली आहे. आदितीचे पात्र मालिकेमध्ये अतिशय जबरदस्त असे आहे. मात्र आदितीने ही मालिका सोडली असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू आहे. आदितीला डेंग्यू झाल्यामुळे तिने मालिका सोडल्याची चर्चा आहे. त्यामुळे आदिती आता या मालिकेतून ब्रेक घेणार असल्याची चर्चा आहे. 

आदितीने अनेक मालिका आणि चित्रपटात देखील काम केले आहे. काही दिवसापासून तिचे सोशल मीडिया अकाउंट तिचे वडील सांभाळत असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण सोशल मीडिया अकाउंटवर तिचे लाखो फॅन्स फॉलोव्हर्स आहेत.

Web Title: This actress fell out of the series 'Sundara Manamadhye Bharli', this is reason