प्राजक्ता गायकवाड, पूजा बिरारीनंतर आणखी एक अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 09:47 IST2025-12-03T09:44:41+5:302025-12-03T09:47:03+5:30
नुकतेच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड-शंभुराज खुडवड आणि पूजा बिरारी-सोहम बांदेकर विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. दरम्यान आता मराठी मालिकाविश्वातील आणखी एक अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे.

प्राजक्ता गायकवाड, पूजा बिरारीनंतर आणखी एक अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, फोटो आले समोर
मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नाचे जोरदार वारे वाहताना दिसत आहेत. नुकतेच बिग बॉस मराठी फेम आणि रिल स्टार सूरज चव्हाणने त्याच्या चुलत मामाच्या मुलीसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर मंगळवारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड-शंभुराज खुडवड आणि पूजा बिरारी-सोहम बांदेकर विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. दरम्यान आता मराठी मालिकाविश्वातील आणखी एक अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे. ही अभिनेत्री म्हणजे 'कुंकू टिकली आणि टॅटू' मालिकेतून घराघरात पोहचलेली भाग्यश्री न्हाळवे (Bhagyashree Nyalave).
अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे हिने मंगळवारी म्हणजेच २ डिसेंबर रोजी उदय यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी भाग्यश्रीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या नात्याची कबुली दिली आहे. शिवाय लग्न पत्रिकेचा फोटो देखील शेअर केला होता. भाग्यश्रीचा नवरा उदय अभिनय क्षेत्रातील नसून पेशाने डॉक्टर आहे.
अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवेने लग्नात पिवळ्या रंगाची नववारी साडी नेसली होती. हातात हिरवा चुडा, नाकात नथ, केसांचा आंबाडा अशा वधूच्या गेटअपमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तर तिच्या नवऱ्याने व्हाइट, पिवळ्या रंगाचा शेरवानी आणि गुलाबी रंगाचं धोतर नेसलं होतं. भाग्यश्रीला मॅचिंग असा गेटअप त्याने केला होता. सोशल मीडियावर त्यांच्या व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
वर्कफ्रंट
भाग्यश्री न्हावळेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिने मराठीसह हिंदी मालिकेतही काम केलंय. 'कुंकू टिकली आणि टॅटू', 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर' तसंच 'माटी से बंधी डोर' या हिंदी मालिकेतही ती झळकली आहे. 'तान्हाजी- द अनसंग वॉरिअर' सिनेमात तिने काम केले आहे. या सिनेमात भाग्यश्रीने सूर्याजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यात तिच्या सूर्याजी मालुसरेंच्या भूमिकेत अभिनेता देवदत्त नागे होता.