चक्क तरूण वयात मराठीतील ही सुंदर अभिनेत्री साकारणार आजीची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 07:15 IST2019-11-30T07:15:00+5:302019-11-30T07:15:00+5:30

साचेबद्ध कामातून बाहेर पडत नवीन शैली व भूमिका स्‍वीकारत ती आता मालिका 'लाल इश्‍क'सह  पहिल्‍यांदाच आजीची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

Actress Asawari Joshi steps into the role of a grandmother with &TV’s Laal Ishq | चक्क तरूण वयात मराठीतील ही सुंदर अभिनेत्री साकारणार आजीची भूमिका

चक्क तरूण वयात मराठीतील ही सुंदर अभिनेत्री साकारणार आजीची भूमिका

अभिनेत्री आसावरी जोशीने मराठी किंवा हिंदी मनोरंजन क्षेत्रामध्‍ये नेहमीच विविध प्रकारच्‍या भूमिका साकारल्‍या आहेत. तरूण वयात आईची भूमिका साकारण्‍याचा धाडसी निर्णय घेणारी आसावरी विविध प्रकारच्‍या भूमिका साकारण्‍याच्‍या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहिली आहे. साचेबद्ध कामातून बाहेर पडत नवीन शैली व भूमिका स्‍वीकारत ती आता मालिका 'लाल इश्‍क'सह  पहिल्‍यांदाच आजीची भूमिका साकारताना दिसणार आहे. 


ही भूमिका साकारण्‍यासाठी तिच्‍या निर्णयाबाबत बोलताना आसावरी म्‍हणाली, ''एक कलाकार म्‍हणून मला माझ्या आवडीच्‍या भूमिकांसह सातत्‍याने प्रयोग करावेसे वाटले आहेत. विविध प्रकारच्‍या भूमिका साकारण्‍याचा धोका असला तरी मला नवीन अनुभव आणि शिकवण देणा-या प्रबळ, सकारात्‍मक व आव्‍हानात्‍मक भूमिका साकारायला आवडतात. तरूण वयात आईची भूमिका साकारण्‍याच्‍या निर्णयाकडे देखील मी दुर्लक्ष केले होते. 
आजीच्‍या भूमिकेसाठी मला विचारण्‍यात आले तेव्‍हाही ही भूमिका योग्‍यरित्‍या साकारण्‍याबाबत काहीसा संकोच होता. विशिष्‍ट भूमिकांसाठीच ओळखले जाण्‍याची भिती माझ्या मनात होती. मी जवळपास ही ऑफर नाकारली होती, पण नंतर होकार दिला. कारण या भूमिकेमुळे मला अलौकिक शैलीमध्‍ये पदार्पण करण्‍याची संधी मिळाली. मला या शैलीबाबत उत्‍सुकता होती आणि या शैलीमधील भूमिका साकारण्‍याची इच्‍छा होती. 


अधिक काही करण्‍याच्‍या इच्‍छेमधून मी ही भूमिका स्‍वीकारत असून ही भूमिता सर्वेात्तम कशी साकारता येइल यावर मी आता मेहनत घेत आहे. आवाजातील बदल व देहबोलीसंदर्भात काही तयारी करत आहे. वेगळ्या प्रकारची भूमिका असल्‍यामुळे अनुभव काहीसा रंजक होता. मी या शैलीमधून मिळणा-या आगळ्या वेगळ्या अनुभवासाठी उत्‍सुक असल्याचे आसावरीने म्हटले आहे. 
 

Web Title: Actress Asawari Joshi steps into the role of a grandmother with &TV’s Laal Ishq