'कसौटी जिंदगी की २'मध्ये नवी एन्ट्री, कोमोलिकाच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 20:30 IST2018-12-08T20:30:00+5:302018-12-08T20:30:00+5:30

स्टार प्लस वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'कसौटी जिंदगी २' मालिकेत आता एक नवीन एन्ट्री होणार आहे.

Actress to appear in 'Kasturi Zindagi Ki 2', a new entry in the role of Kamolika's sister | 'कसौटी जिंदगी की २'मध्ये नवी एन्ट्री, कोमोलिकाच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री

'कसौटी जिंदगी की २'मध्ये नवी एन्ट्री, कोमोलिकाच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री

ठळक मुद्देअरीना डे 'कसौटी जिंदगी की २'मध्ये कोमोलिकाच्या बहिणीच्या भूमिकेत अरीना डेने मुस्कान मालिकेत केली होती मुख्य भूमिका

स्टार प्लस वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'कसौटी जिंदगी २' मालिकेत आता एक नवीन एन्ट्री होणार आहे. या मालिकेचे चाहते गेल्या काही दिवसांपासून कोमोलिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री हिना खानला खूप मिस करत आहेत. कारण सध्या हिना तिचा हिंदी चित्रपट लाइन्सचे चित्रीकरण काश्मीरमध्ये करते आहे. त्यामुळे या मालिकेत कोमोलिका पात्राची कमतरता भरून काढण्यासाठी कारस्थानी व्यक्तीची एन्ट्री होणार आहे. 

बॉलिवूड लाइफच्या वृत्तानुसार 'मुस्कान' मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी बंगाली अभिनेत्री अरीना डे 'कसौटी जिंदगी की २'मध्ये कोमोलिकाच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. ती प्रेरणा व अनुरागच्या जीवनात आग लावताना दिसणार आहे. 
'लाइन्स' सिनेमात हिना खान एका स्वतंत्र बाण्याच्या मुलीची भूमिका साकारताना दिसेल. या चित्रपटाची कथा ९० च्या दशकातील काश्मिरवर आधारित आहे. हुसैन खान दिग्दर्शित या चित्रपटाची कथा राहत काजमी आणि शक्ती सिंह यांनी लिहिलीय.
हिना खानला आजही तिचे चाहते हिना म्हणून कमी आणि ‘अक्षरा बहु’ म्हणून अधिक ओळखतात. आपली ही ओळख पुसण्यासाठी हिनाने जीवाचा बराच आटापीटा केला.   साचेबद्ध कामात अडकून न राहता काही तरी हटके करायच्या निर्णयामुळेच तिने ‘ये रिश्ता....’ मालिका सोडत आव्हानात्मक कामे स्विकारली. मालिकेनंतर ती रिअ‍ॅलिटी शोमध्ये झळकली. ‘बिग बॉस 11’ आणि ‘खतरों के खिलाडी सिझन 8’ मध्येही सहभागी झाली. त्यानंतर आता ती ‘कसौटी जिंदगी की 2’ मालिकेत कोमोलिका भूमिका साकारत आहे.

Web Title: Actress to appear in 'Kasturi Zindagi Ki 2', a new entry in the role of Kamolika's sister