'नवा गडी नवं राज्य' मालिकेनंतर अभिनेत्री अनिता दाते दिसणार या नाटकात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 12:59 PM2023-12-19T12:59:58+5:302023-12-19T13:01:57+5:30

Anita Date : अनिता दाते लवकरच रंगभूमीवर काम करताना दिसणार आहे.

Actress Anita Date will be seen in this drama after the serial 'Nava Gadi Navam Rajya' | 'नवा गडी नवं राज्य' मालिकेनंतर अभिनेत्री अनिता दाते दिसणार या नाटकात

'नवा गडी नवं राज्य' मालिकेनंतर अभिनेत्री अनिता दाते दिसणार या नाटकात

झी मराठी वाहिनीवरील नवा गडी नवं राज्य (Nava Gadi Nava Rajya) ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत रमाची भूमिका अभिनेत्री अनिता दाते (Anita Date) हिने साकारली आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेचं सर्वत्र खूप कौतुक झाले. दरम्यान आता अनिता दाते लवकरच रंगभूमीवर काम करताना दिसणार आहे. ती माझ्या बायकोचा नवरा नाटकात दिसणार आहे. याबाबत तिनेच पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

अनिता दाते हिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, आता यापुढे जे काही घडणार आहे ते विलक्षण चमत्कारिक आहे. असं म्हणतात की आपल्या कर्माची फळं आपल्याला ह्याच जन्मात भोगावी लागतात तर आता भोगा.... प्रसाद कांबळी सादर करीत आहे 'भद्रकाली'ची ५९ वी पूर्णपणे क्रेझी नाट्यकृती 'माझ्या बायकोचा नवरा'.

'माझ्या बायकोचा नवरा' नाटकाबद्दल...
प्रसाद कांबळी यांच्या भद्रकाली प्राॅडक्शन्सची ५९ वी धमाकेदार नाट्यकृती 'माझ्या बायकोचा नवरा' ही आता लवकरच रंगभूमीवर येण्यास सज्ज झाली असून या नाटकाचा शुभरंभाचा प्रयोग येत्या रविवारी म्हणजेच २४ डिसेंबरला आचार्य अत्रे रंगमंदिर,कल्याण येथे होणार आहे. या धमाल विनोदी नाटकाची निर्मिति श्रीमती कविता मच्छिन्द्र कांबळी, दिनू पेडणेकर, अभिजित देशपांडे, राहुल कर्णिक यांनी केली आहे.या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन सागर देशमुख यांनी केले असून सागर देशमुख, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.  "माझ्या बायकोचा नवरा" हे विनोदी नाटक नवरा बायकोच्या नात्याबद्दलचं आहेच पण, नात्यातली असुरक्षितता आणि चिरंतर प्रेमाबद्दलही बोलणारं आहे. 
 

Web Title: Actress Anita Date will be seen in this drama after the serial 'Nava Gadi Navam Rajya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.