अभिनेत्री व नृत्यांगणा सुकन्या काळणचा पार पडला साखरपुडा, कुशल बद्रिकेनं पत्नीसह लावली हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 18:17 IST2023-12-18T18:16:23+5:302023-12-18T18:17:33+5:30

Sukanya Kalan : अभिनेत्री आणि नृत्यांगणा सुकन्या काळण हिने गुपचूप साखरपुडा केला आहे. तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

Actress and dancer Sukanya Kalan's Sakharpuda, Kushal Badrike attended with his wife | अभिनेत्री व नृत्यांगणा सुकन्या काळणचा पार पडला साखरपुडा, कुशल बद्रिकेनं पत्नीसह लावली हजेरी

अभिनेत्री व नृत्यांगणा सुकन्या काळणचा पार पडला साखरपुडा, कुशल बद्रिकेनं पत्नीसह लावली हजेरी

मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकानंतर एक कलाकार मंडळी लग्नगाठ बांधताना दिसत आहेत. सुरुची अडारकर-पियुष रानडे, प्रसाद जवादे-अमृता देशमुख यांचे नुकतेच लग्न पार पडले तर स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी, मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. तसेच नुकतेच अभिनेत्री पूजा सावंतने देखील सोशल मीडियावर फोटो शेअर करत साखरपुडा झाल्याचे जाहीर केले. दरम्यान आता आणखी एका अभिनेत्री आणि नृत्यांगणा सुकन्या काळण (Sukanya Kalan) हिने गुपचूप साखरपुडा केला आहे. तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. 

सुकन्या काळण हिचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला आहे. तिच्या साखरपुड्याला कुशल बद्रिके आणि त्याची पत्नी सुनैना हजेरी लावली होती. सुनैना बद्रिकेने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सुकण्याच्या साखरपुडा सोहळ्यातील व्हिडीओ, फोटो शेअर केले आहेत. 

वर्कफ्रंट..
सुकन्या काळण ही मुळची पुण्याची असून ती एका पेक्षा एक या डान्स रिएलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. या शोमधून ती लोकप्रिय झाली. तिने मराठी चित्रपटातही काम केले आहे. तिने मेनका उर्वशी व तु का पाटील चित्रपटात काम केले आहे. तु. का. पाटील चित्रपटात सुकन्याने नृत्यांगणेची भूमिका केली होती. तिच्या बोल्ड फोटोशूटचीही खूप चर्चा रंगली होती. तिच्या न्यूड फोटोशूटनं सोशल मीडियावर धुमाकुळ घातला होता. याशिवाय तिने काही मालिकेतही काम केले आहे. ‘कन्यादान, ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेत ती झळकली आहे.
 

Web Title: Actress and dancer Sukanya Kalan's Sakharpuda, Kushal Badrike attended with his wife