'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, 12 वर्षांपूर्वीच मिळाली होती ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 11:02 IST2020-08-17T11:02:29+5:302020-08-17T11:02:47+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत हा प्रसिद्ध अभिनेता झळकणार आहे. 

The actor's entry in 'Taraq Mehta Ka Ulta Chashma' was offered 12 years ago | 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, 12 वर्षांपूर्वीच मिळाली होती ऑफर

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, 12 वर्षांपूर्वीच मिळाली होती ऑफर

छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका वर्षानुवर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेने व त्यातील पात्राने रसिकांच्या मनात घर केले आहे. मात्र आता या मालिकेत एका नव्या कलाकाराची एन्ट्री होणार आहे. हा अभिनेता म्हणजे राकेश बेदी. तो तारक मेहताच्या बॉसची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष बाब म्हणजे त्यांना 12 वर्षांपूर्वीच या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार राकेश बेदी यांनी 14 ऑगस्टपासून शूटिंगला सुरूवात केली. ते म्हणाले की, माझी भूमिका फारच इंटरेस्टिंग आहे. 12 वर्षांपूर्वी जेव्हा ही मालिका सुरू झाली तेव्हा मला या रोलविषयी सांगण्यात आले होते. 

मी तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढाच्या बॉसची भूमिका साकारत आहे. पुस्तकातील मूळ कथेत या भूमिकेचा उल्लेख आहे. ही भूमिका फार महत्त्वाची आहे. पण त्यावेळी या भूमिकेला फारसे महत्त्व दिले गेले नव्हते आणि तेव्हा कथानकात जेठालाल मुख्य व्यक्तिरेखा होती, असे राकेश बेदी यांनी सांगितले.

राकेश बेदी यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्यांनी याआधी भाभीजी घर पर है या मालिकेत अंगुरी भाभीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यापूर्वी ते ‘श्रीमान श्रीमती’, ‘जबान संभालके’ यांसारख्या बऱ्याच कॉमेडी शो आणि मालिकेत झळकले आहेत.

Web Title: The actor's entry in 'Taraq Mehta Ka Ulta Chashma' was offered 12 years ago