​‘खिचडी’ या मालिकेचा भाग असणार अभिनेत्री ट्विंकल खन्ना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 13:41 IST2017-12-08T08:11:53+5:302017-12-08T13:41:53+5:30

२००४ मध्ये प्रसारित झालेली ‘खिचडी’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय बनली. नंतर त्या मालिकेवर आधारित चित्रपटही प्रदर्शित झाला होता. या ...

Actor Twinkle Khanna was part of the series 'Khichdi' | ​‘खिचडी’ या मालिकेचा भाग असणार अभिनेत्री ट्विंकल खन्ना

​‘खिचडी’ या मालिकेचा भाग असणार अभिनेत्री ट्विंकल खन्ना

०४ मध्ये प्रसारित झालेली ‘खिचडी’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय बनली. नंतर त्या मालिकेवर आधारित चित्रपटही प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता ही मालिका नव्या स्वरूपात प्रसारित होणार असून या मालिकेची सध्या जोरदार तयारी सुरू आहे.
खिचडी या मालिकेतील राजीव मेहता, अनंग देसाई, वंदना पाठक तसेच सुप्रिया पाठक हे कलाकार नव्या आवृत्तीतही कायम ठेवण्यात आले आहेत. जुन्या कलाकारांप्रमाणे काही नवे कलाकार देखील आता या मालिकेचा भाग असणार आहेत. या मालिकेत रेणुका शहाणे, सुनील ग्रोव्हर, बलविंदर सिंग यांची एंट्री होणार आहे.
‘मिसेस फनीबोन्स’ या टोपणनावाने नर्म विनोदी लेखन करणारी अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिचे ‘मिसेस फनीबोन्स’ नावाचे पहिले पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर तिच्या लोकप्रियतेत भरपूर वाढ झाली होती. आता ‘खिचडी’ या मालिकेची पटकथा अधिकाधिक विनोदी बनवण्यासाठी निर्माते ट्विंकल खन्नाची मदत घेत असल्याची चर्चा सुरू आहे. ट्विंकलने मेला, बादशहा, जब प्यार किसीसे होता है, बरसात यांसारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. पण अभिनयक्षेत्रात तितकीशी प्रसिद्धी न मिळाल्याने ट्विंकल अभिनय क्षेत्रापासून दूर झाली. पण एक लेखिका म्हणून तिने आज तिचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. तिचे आगामी पुस्तक कधी येणार याची तिचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात असतात.
ट्विंकल खन्ना स्वत: खिचडी या मालिकेची मोठी चाहती आहे आणि त्यामुळे तिने काही विनोदी किस्से वा प्रसंग मालिकेसाठी लिहावेत, अशी विनंती निर्मात्यांनी तिच्याकडे केल्याचे समजतंय. ट्विंकल या मालिकेत दिसणार नसली, तरी तिने लिहिलेले संवाद, दृश्यांचा समावेश ‘खिचडी’च्या पटकथेत केला जाणार आहे. त्यामुळे या मालिकेचा स्तर अधिकच उंचावेल, अशी निर्मात्यांना खात्री आहे.
ट्विंकलबरोबर यासंदर्भात अद्याप काहीही लेखी करार झाला नाहीये. पण हा करार झाल्यावर तिचे नाव या मालिकेत झळकेल असे म्हटले जात आहे. ट्विंकलच्या लेखणीमुळे ही मालिका अधिक रंजक होईल यात काही शंकाच नाही.  

Also Read : खिचडी या मालिकेत सुनील ग्रोव्हर साकारणार ही भूमिका

Web Title: Actor Twinkle Khanna was part of the series 'Khichdi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.