'राजा राणीची जोडी' मालिकेतील या अभिनेत्याने केले गुपचूप लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 12:41 IST2022-01-08T12:40:00+5:302022-01-08T12:41:03+5:30

'राजा राणीची जोडी' (Raja Ranichi Jodi) या मालिकेमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्याने नुकतेच लग्न केले आहे.

The actor in the series 'Raja Ranichi Jodi' got married secretly | 'राजा राणीची जोडी' मालिकेतील या अभिनेत्याने केले गुपचूप लग्न

'राजा राणीची जोडी' मालिकेतील या अभिनेत्याने केले गुपचूप लग्न

कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘राजा राणीची जोडी’ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविते आहे. ही मालिका लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेमध्ये संजीवनी आणि रणजित यांच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण मालिकेमध्ये विभा हिची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आता या मालिकेत नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्याने नुकतेच लग्न केले आहे.

राजा राणीची जोडी या मालिकेमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्याने नुकतेच लग्न केले आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून शैलेश कोरडे हा आहे. शैलेश कोरडे याने राजा राणीची जोडी या मालिकेमध्ये दादा साहेबांची भूमिका साकारली आहे. दादा साहेबांची भूमिका या मालिकेतील महत्त्वाची भूमिका असून ही भूमिका खूप चर्चेत आली होती. इतकेच नाही तर दादासाहेबांचा लूकदेखील खूप चर्चेत आलेला आहे.


दादासाहेब म्हणजेच अभिनेता शैलेश कोरडे याने अभिनेत्री श्रुती कुलकर्णी हिच्या सोबत लग्न केले आहे. गेल्या आठ वर्षापासून हे दोघे रिलेशनशीपमध्ये आहेत. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे या दोघांनी आपले लग्न काही वर्ष पुढे टाकले होते. अखेर आता ते विवाहबद्ध झाले आहेत.त्यांच्या लग्नाला काही मोजकेच लोक उपस्थित होते. 

Web Title: The actor in the series 'Raja Ranichi Jodi' got married secretly